Share Market Today Saam Tv
बिझनेस

Share Market today : शेअर मार्केटवरील 'संक्रात' टळली; १० शेअरने केली भन्नाट कामगिरी, कोणाचा दिवस झाला गोड?

Share Market today update : आज शेअर मार्केटवरील 'संक्रात' टळली आहे. आज १० शेअरने भन्नाट कामगिरी करत जबरदस्त उसळी घेतली आहे. आज शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये असल्याने दिवस गोड झाला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : आज देशभरात मकर संक्रात साजरी केली जात आहे. याचदरम्यान काल गडगडलेला शेअर बाजार आज सावरला आहे. शेअर बाजार मंगळवारी सकाळी सुरु झाल्यानंतर दोन्ही इंडेक्स ग्रीन झोनमध्ये सुरु झाले. शेअर बाजाराचे ३० कंपन्यांच्या सेन्सेक्सने काही मिनिटात ४५० अंकांनी उसळी घेतली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीने देखील १२५ अंकांनी उसळी घेतली.

शेअर बाजार मंगळवारी सकाळपासून उसळी घेताना दिसत आहे. बीएसई सेन्सेक्स सोमवारी ७६,३३०.०१ वर बंद झाला होता. त्यानंतर आज सेन्सेक्सने उसळी घेत ७६,७७९.४९ वर पोहोचला. सेन्सेक्ससारखा एनएसई निफ्ट-५० देखील २३,०८५,९५ वर उसळी घेऊन २३,१६५.९० वर सुरु झाला. त्यानंतर १३३.९० अंकांनी उसळी घेऊन २३,२२७.२० ट्रेड सुरु झाला.

१० शेअरने घेतली जबरदस्त उसळी

आज शेअर बाजारावरील 'संक्रात' टळली आहे. Zomato (3.32 टक्के), NTPC (3.27 टक्के), indusind bank (3.27 टक्के) Adani Ports (2.88 टक्के) आणि टाटा मोटर्स (3.07 टक्के) या शेअरने चांगली उसळी घेतली आहे.

Biocon (4.14 टक्के), Suzlon (3.25 टक्के), yes Bank (3.24 टक्के) या शेअरनेही उसळी घेतली आहे. स्मॉल कंपन्यामधील TD Power system (8.07 टक्के) , Times Share (3.44 टक्के) शेअरनेही उसळी घेतली आहे.

सोमवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स ७७,३७८.९१ वरून घसरून ७६,६२९.९० स्तरावर सुरु झाला. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शेअर बाजार बंद झाल्यानंतर बीएसई सेन्सेक्स १०४९.९० अंकांनी म्हणजे १.३६ टक्क्यांनी घसरून ७६.३३०.०१ वर बंद झाला.

NSE निफ्टी देखील मागील शुक्रवारी २३,४३१.५० च्या पातळीवरून घसरून २३,१९५.४० वर सुरु झाला होता. शेअर बाजारातील व्यवहार बंद झाल्यावर निफ्टी ३४५.५५ अंकांनी म्हणजे १.४७ टक्क्यांनी घसरून २३,०८५.९५ वर बंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT