Share Market Opening Update Today Saam Tv
बिझनेस

Stock Market Today: शेअर बाजारात जबरदस्त खरेदी; सेन्सेक्सने घेतली 791 अंकानी उसळी, निफ्टीने केला नवा विक्रम

Vishal Gangurde

Share Market:

शेअर बाजारात सकाळी जबरदस्त खरेदी झाली. त्यानंतर दुपारी शेअर बाजारात नवा विक्रम पाहायला मिळाला आहे. निफ्टी आज ऑल टाइम हाय लेव्हलवर ट्रेड करत होता. निफ्टी इंडेक्सने 200 अंकानी उसळी घेत 21,848.20 च्या पार गेला. तर दुसरीकडे बीएसई सेन्सेक्सने 791 अंकानी उसळी घेतली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स 72,513 अंकावर पोहोचला. तर आज आयटी सेक्टरमधील इन्फोसिसच्या शेअरमध्येही तेजी पाहायला मिळाली. (Latest Marathi News)

गुरुवारी निफ्टी 21,647.20 अंकावर पोहोचला. तर शुक्रवारी निफ्टी 21,773.55 वर खुला झाला. तर आज शुक्रवारी दुपारी निफ्टी 21,848.20 वर पोहोचला. दुसरीकडे सेन्सेक्स शुक्रवारी 72,148.07 वर खुला झाला. त्यानंतर आज 1.10 टक्क्यांनी उसळी घेऊन 72,513 अंकावर पोहोचला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयटी सेक्टरमध्ये तेजी

शेअर बाजारात आज शुक्रवारी आयटी सेक्टरच्या शेअरमध्ये जबरदस्त तुफानी पाहायला मिळाली. इन्फोसिसच्या (infosys) शेअरमध्ये ४२ महिन्यांनतर मोठी तेजी पाहायला मिळाली. या शेअरने ७.५५ टक्क्यांनी उसळी घेऊन 1,687 रुपयांमध्ये प्रति शेअर व्यवहार सुरु आहे. विप्रोच्या शेअरने 4.09 टक्क्यांनी उसळी घेऊन त्यांचा शेअर हा 466.55 रुपये प्रति शेअरवर पोहोचला. तर टीसीएसच्या शेअरने ४ टक्क्यांनी उसळी घेऊन प्रति शेअर 3,883 रुपयांवर पोहोचला आहे.

गुतंवकणूकदारांची कोटींची कमाई

शेअर बाजारात आज चांगलीच तेजी पाहायला मिळाली. कारण आज बीएसई सेन्सेक्सने उसळी घेतली. आज गुंतवणूकदारांची चांगलीच कमाई केली. आज शुक्रवारी एकूण गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत २.५ लाख कोटींनी वाढ झाली आहे. दरम्यान, बीएसईच्या ३० शेअरपैकी १९ शेअरने तेजी पाहायला मिळाली. तर ११ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. (Share Marekt Today)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT