ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगातील लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपमुळे अनेक कामे सोपी होतात. कोणालाही माहिती पाठवणे किंवा माहिती मिळवणे सोपे होते. व्हॉट्सअॅप नेहमीच युजर्संना वापरासाठी सोपे व्हावे यासाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असतात.
व्हॉट्सअॅपने नुकतेच नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरचा वापर करुन युजर्स स्वतः स्टिकर्स तयार करु शकणार आहेत. हे नवीन अपडेट आल्यानंतर अॅपमध्ये स्टिकर्स एडिट आणि डिझाइन करता येणार आहे. (Latest News)
एका रिपोर्टनुसार, नवीन अपडेट झाल्यावर युजर्संना कोणालाही स्टिकर्स पाठवणे सोपे होणार आहे. नवीन अपडेटनंतर युजर्संना स्टिकर्स बनवण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची गरज भासणार नाही.
व्हॉट्सअॅपवर स्टिकर्स बऱ्याच काळापासून आहे. स्टिकर्सच्या मदतीने अनेकदा चॅटिंग करणे सोपे होते. कोणतीही गोष्ट शॉर्ट आणि स्वीट स्वरुपात पाठवता येते. परंतु यासाठी युजर्संना दुसऱ्या अॅपवर जाऊन त्यावर स्टिकर्स बनवावे लागायचे. मात्र, आता युजर्संना स्वतः स्टिकर्स तयार करता येणार आहे. हे नवीन अपडेट लवकरच मोबाईलमध्ये सुरू होणार आहे.
यासाठी तुम्हाला मजकूर बॉक्सच्या उजवीकडे असणारे स्टिकरवर क्लिक करुन स्टिकर ट्रे उघडा. त्यानंतर स्टिकर तयार करा हा पर्याय निवडा. गॅलरीमधून कोणताही एक फोटो निवडा. त्यानंतर कटआउटची निर्मिती करा आणि त्यावर तु्म्ही स्वतः च्या आवडीचा स्टिकर्स तयार करा.
Edited By-Siddhi Hande
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.