Sameer Wankhede: कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी मोठी अपडेट; समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा

Cordelia cruise Case : समीर वानखेडे यांनी २ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी दरम्यान छापा टाकला होता. तेथे अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. आर्यन खान २६ दिवस मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बंद होता. यानंतर आर्यनला जामीन मिळाला. आर्यन खानला सोडण्याप्रकरणी शाहरूख खानकडून खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडेंवर आहे.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSaam Tv
Published On

(सचिन गाड)

Cordelia cruise Case Sameer Wankhede:

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय. खंडणी प्रकरणात समीर वानखेडेंची १५ फेब्रुवारीपर्यंत अटक टळलीय. वानखेडेंनी कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप सीबीआयने केला होता. (Latest News)

सीबीआयनं दाखल केलेला खंडणीचा गुन्हा रद्द करण्यात यावा आणि अटक टाळण्यासाठी समीर वानखेडेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याप्ररकरणी आज हायकोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायालाने समीर वानखेडेंना १५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा कायम ठेवलाय. सीबीआयतर्फे एएसजी बाजू मांडणार आहेत.

कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी झाली त्यावेळी समीर वानखेडे हे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मध्ये झोनल डायरेक्टर होते. आर्यन खानला ड्रग प्रकरणातून मुक्त करण्यासाठी अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्याच्यासह अन्य चार आरोपींवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com