Share Market today  Saam tv
बिझनेस

Share Market Today: भारत-पाक तणाव निवळताच शेअर बाजारात 'अच्छे दिन', सेन्सेक्सची भरारी, निफ्टीही सुसाट

Share Market Today: शेअर मार्केटवर भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम पाहायला मिळाला. दरम्यान, आता भारत पाकिस्तान युद्ध थांबल्यानंतर शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली.

Siddhi Hande

भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. प्रत्येक गोष्टीवर युद्धाचा परिणाम पाहायला मिळाला. युद्धाच्या काळात शेअर मार्केटमध्ये मंदी पाहायला मिळाली. परंतु आज बऱ्याच दिवसांनी शेअर मार्केट हिरव्या रंगामध्ये उघडला आहे. भारत पाकिस्तानमधील तणावाचा हा परिणाम होता. मात्र, आता युद्ध थांबल्यामुळे शेअर मार्केटमध्ये वाढ होताना दिसत आहे.

भारत पाकिस्ताना युद्धाला पुर्णविराम मिळताच शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. शेअर मार्केटमध्ये आज तेजी दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांची मात्र चांदी झाली आहे. आज बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) १५०० पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह उघडला.

शेअर मार्केट (Share Market Today) आज वाढीसह उघडला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच बीएसई सेन्सेक्स २२०० पेक्षा जास्त अंकांनी वाढला. सकाळी १० वाजता हा शेअर २,२४१.५५ अंकांनी वाढून ८१,६९६.०२ वर व्यव्हार करत होता. याचसोबत निफ्टी ५० मध्येही वाढ झाली आहे. निफ्टी ६९६.१५ अंकांनी वाढून २४,७०४ वर व्यव्हार करत होता.आज सगळ्याच शेअर्स तेजीत व्यव्हार करत आहेत.

बीएसई (BSE) लिस्टेड कंपन्यांचे भांडवल ११.१ लाख कोटी रुपयांनी वाढून ४२७.४९ लाख कोटी रुपये झाले आहे. अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. मेडिसिन क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये आज वाढ पाहायला मिळाली आहे.

शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये मंदी होती. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अंबांनी अदानी कंपनीच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: कुणी नवं घर देतं का घर...आमदाराचा हस्तक्षेप अन् म्हाडाचा अनागोंदी कारभार, ८०३ कुटुंबियांच्या घराचं स्वप्न बेचिराख

Maharashtra Live News Update: नागपुरात शेतकऱ्यांच्या सरकारच्या विरोधात घोषणा

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अखेर आरोपी PSI बदनेचा मोबाईल सापडला, कुठं लपवला होता?

Cabbage Cutlet Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत कोबीचे कटलेट, संध्याकाळच्या नाश्त्याचा चमचमीत बेत

Pune Tourism : कॅम्पिंग, ट्रेकिंगसाठी पुण्यातील ऐतिहासिक ठिकाण, येथून दिसतो निसर्गाचा अद्भुत नजारा

SCROLL FOR NEXT