Share Market Nifty Saam Tv
बिझनेस

Share Market: निफ्टीची झेप 'ऑल टाइम हाय'; पहिल्यांदाच २१६०० अंकांवर, शेअर बाजारात इतकी तेजी कशामुळं?

Share Market Nifty : आज निफ्टीच्या निर्देशांकात पुन्हा एकदा उच्चांकाचा टप्पा गाठलाय.आजच्या विक्री खरेदीच्या सत्रादरम्यान निफ्टीने २१,६०३.४० अंकांवर पोहोचत नवा उच्चांक स्तर गाठला. टाटा मोटर्स, टाटा स्टील, एसबीआय लाईफ आणि इंडसइंड बँकेच्या समभागही आज मजबूत स्थितीत आहेत.

Bharat Jadhav

Share Market Nifty Hits Fresh Peak :

आज भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या व्यवहारात तेजी आहे. आज निफ्टीच्या निर्देशांकात पुन्हा एकदा उच्चांकाचा टप्पा गाठलाय. आजच्या विक्री खरेदीच्या सत्रादरम्यान निफ्टीने २१,६०३.४० अंकांवर पोहोचत नवा उच्चांक स्तर गाठला. निफ्टी निर्देशांक २१,५८९ च्या पातळीवर व्यवहार करत आहे. (Latest News)

निफ्टीमध्ये हिंदाल्कोचे शेअर्स ३.९३ टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक ६०२.६५ रुपयांवर व्यवहार करताना दिसले. टाटा मोटर्स, टाटा स्टील, एसबीआय लाईफ आणि इंडसइंड बँकेच्या समभागांनीही आज जोरदार मजबूती दाखवली. जागितक बाजारातील वाढीनंतर बँकिंग, ऑटो आणि आयटी क्षेत्रातील शेअर्स मजबूत स्थितीत आलेत. याच्या जोरावर भारतीय शेअर्स बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. निफ्टी पहिल्यांदाच २१,६००च्या स्तरावर पोहोचण्यास यशस्वी ठरला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निफ्टी निर्देशांक पहिल्यांदाच २१,६००च्या स्तरावर पोहोचण्यास यशस्वी ठरला आहे. सकाळी १२.१५ वाजता निफ्टी १४१ अंक किंवा ०.६६ टक्क्यांच्या वाढीसह २१,५८२ च्या पातळीवर पोहोचला. तर सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रिड, आणि टाटा मोटर्सच्या शेअर्स एका टक्क्यांची वाढ झाली. ह्या शेअर्सने टॉप गेनर्सचं काम करत बाजारात तेजी आणली. जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, टाटा स्टील आणि एलएंडटीच्या शेअर्समध्येही वाढ दिसली. आज एचडीएफसी बँक आणि सन फार्माच्या शेअर्सची स्थिती खराब दिसली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

SCROLL FOR NEXT