SBI Bank on WhatsApp: बँकेच्या तब्बल १३ सेवा मिळतील तुमच्या व्हॉट्सअपवर, जाणून सर्व सुविधांची माहिती

State Bank Of India Bank Provide Service Through Whatsapp: बँकेच्या सेवांवर नाराज असलेले ग्राहक एसबीआय बँकेवर राग काढतात. बँकेतील सेवा चांगली नसल्याची तक्रार करतात. बँकेतील गर्दीमुळे ग्राहकांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. यामुळे अनेक ग्राहक वैतागतात. ग्राहकाच्या अशा अडचणी दूर करण्यासाठी बँकेने नवीन सुविधा सुरू केलीय.
State Bank Of India Bank Provide 13 Services On Your Whatsapp Know All Facilities Here
State Bank Of India Bank Provide 13 Services On Your Whatsapp Know All Facilities Heresaam Tv
Published On

SBI Bank on WhatsApp:

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देण्यात येणाऱ्या सेवांमुळे बहुतेकवेळा एसबीआय चर्चेत असते. परंतु एसबीआय आता आपल्या ग्राहकांना खूश ठेवण्यावर भर देत आहे. ग्राहकांना उत्तम प्रकारची सेवा देण्यावर बँक व्यवस्थापन काम करत आहे, यामुळे गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वं नागरिकांची आवडती बँक म्हणून एसबीआयला पसंती दिली जात आहे. आपल्या ग्राहकाचं मन जिंकण्यासाठी बँकेने अजून एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांना घरापर्यंत सेवा देत आहे. (Latest News)

स्टेट बँक ऑफ इंडिया आता WhatsApp वर अनेक बँकिंग सेवा देत आहे. ग्राहक त्यांच्या मोबाइल फोनचा वापर करून QR कोड स्कॅन करून WhatsApp द्वारे SBI बँक सेवा घेऊ शकतात. बँक खात्यातील जमा रक्कम, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप, कर्जाची माहिती अशा तब्बल १३ बँकिंग सेवा SBI WhatsApp वरून देत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

State Bank Of India Bank Provide 13 Services On Your Whatsapp Know All Facilities Here
Post Office TD Vs SBI FD: गुंतवणूक करताय? जाणून घ्या, कुठे गुंतवणूक केल्यास मिळेल सर्वाधिक व्याज

बँकेच्या सुट्ट्या तपासा

SBI WhatsApp बँकिंग सेवेचा वापर करून बँकेच्या सुट्ट्या शोधणे देखील शक्य आहे. SBI ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी WhatsApp सेवा वापरू शकतात. ही सेवा बचत आणि चालू खातेधारक दोन्हीसाठी उपलब्ध आहे.

मिनी स्टेटमेंट

एसबीआय आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगद्वारे मिनी स्टेटमेंट पाहण्याची सुविधा देखील देत आहे. यात लिंक केलेल्या खात्यातील शेवटच्या दोन व्यवहार तपशील दिला जाईल.

State Bank Of India Bank Provide 13 Services On Your Whatsapp Know All Facilities Here
SBI Bank Recruitment 2023: तरुणांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये ५२८० जागांसाठी पदभरती सुरु, कसा कराल अर्ज?

पेन्शन स्लिप सेवा

जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांची पेन्शन चालू आहे. ते ग्राहक एसबीआय व्हॉट्सअॅप बँकिग सेवेद्वारे पेन्शन स्लिप जनरेट म्हणजेच तयार करू शकतात.

बँकिंग कामांच्या स्लिप मिळतील

एसबीआय व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवेचा वापर करून ग्राहक सामान्य बँकिंग स्लिप्स मिळवू शकतील. उदा. डिपॉझिट फॉर्म, पैसे काढण्याची स्लिप.

बँकेतील ठेवीचा तपशील

SBI WhatsApp बँकिंग ग्राहकांना बचत खाते, आवर्ती ठेव Recurring Deposit (RD), मुदत ठेव (FD), आणि टर्म ठेवसह इतर ठेवीचा तपशील आपण यातून जाणून घेऊ शकतो.

कर्जाचे तपशील

SBI ग्राहक व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगद्वारे गृह कर्ज, कार कर्ज, सुवर्ण कर्ज (गोल्ड लोन), वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादी सेवांचा तपशील तपासू शकतो.

नवीन बँक खाते उघडता येणार

WhatsApp बँकिंग सेवेद्वारे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ग्राहक नवीन SBI Insta खाते उघडू शकतात. हे नवीन खाते उघडण्याशी पात्रता आणि कागदपत्रांची काय आवश्यकता असेल याची सर्व माहिती व्हॉट्सअ‍ॅपवरून मिळेल. परदेशात राहणारे लोक NRE खाते, NRO खाते तपशील सुद्धा SBI WhatsApp बँकिंग द्वारे घेऊ शकतील.

डेबिट कार्डची माहिती

बँक खातेधारकरांकडे डेबिट कार्ड असेल ते ग्राहक आपल्या डेबिट कार्डची माहिती घेऊ शकतात. डेबिट कार्डचा किती वापर झालाय, त्यावरून करण्यात आलेले व्यवहारांची माहितीदेखील या व्हॉट्सअपवरून घेऊ शकतात.

कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर

ग्राहक एसबीआय व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवेद्वारे हरवलेले आणि चोरी झालेले कार्डची सेवा देखील मिळवू शकतात.

जवळचं एटीएम दाखवेल

नियमित बँकिंग सेवांव्यतिरिक्त, SBI WhatsApp बँकिंग ग्राहकांना त्यांच्या जवळील SBI ATM किंवा शाखा शोधण्यात मदत करेल.

संपर्क/तक्रार निवारण हेल्पलाइन

व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगच्या सेवेतून ग्राहक त्यांच्या एसबीआय खात्याशी संबंधित अधिकृत संपर्क तपशील, तक्रारी नोंदवू शकतात.

पूर्व-मंजूर कर्जाच्या समस्या

SBI आपल्या ग्राहकांना पूर्व-मंजूर कर्जे देखील ऑफर करते. (वैयक्तिक, कार आणि दुचाकी कर्ज). ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवरून त्यांच्या पूर्व-मंजूर कर्जांचे तपशील तपासू शकतात.

SBI WhatsApp सेवा कशी मिळवाल

एसबीआय व्हॉट्सअप बँकिंग सेवा मिळवण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून खालील "WAREG खाते क्रमांक" या स्वरूपात +917208933148 वर एसएमएस पाठवा.

उदाहरणार्थ, जर तुमचा खाते क्रमांक 123456789 असेल, तर मी WAREG 123456789 म्हणून +917208933148 वर एसएमएस पाठवा. जर नोंदणी यशस्वी झाली तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या तुमच्या Whatsapp वर एक संदेश येईल. त्यानंतर +919022690226 नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि नंतर WhatsApp उघडा आणि त्या नंबरवर "Hi" पाठवा. त्यानंतर, चॅट बॉटद्वारे देण्यात आलेल्या ऑन-स्क्रीन सूचनांचे पालन करा.

State Bank Of India Bank Provide 13 Services On Your Whatsapp Know All Facilities Here
Bank of Baroda ने सुरू केली BOB Parivar Accountची सुविधा; एका कुटुंबाचं एक बँक खातं, फायदे मिळतील अनेक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com