Share Market Saam tv
बिझनेस

Share Market : सलग १० व्या दिवशी शेअर बाजारात पडझड; डोनाल्ड ट्रम्प यांचा इफेक्ट कायम, आज कोणते शेअर ठरले टॉप गेनर्स?

Share Market today : सलग १० व्या दिवशी शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांचा इफेक्ट कायम आहे. आज कोणते शेअर ठरले टॉप गेनर्स? जाणून घ्या.

Vishal Gangurde

सलग १० व्या दिवशी शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी देखील स्टॉक मार्केट लाल रंगात दिसत आहे .आज बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स ९६ अंकांनी म्हणजे ०.१३ टक्क्यांनी घसरून ७२,९८९.९३ पातळीवर घसरला. तर निफ्टी ५० इंडेक्स ३६.६५ अंकांनी म्हणजे ०.१७ टक्क्यांनी घसरून २२,०८२,६५ वर पोहोचला.

टोप गेनर्स शेअर्स कोणते?

आज शेअर बाजारावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफचा प्रभाव पाहायला मिळत आहे. आज ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीसीएलचे शेअर ३.१० टक्क्यांनी वाढून २४९.९२ वर बंद झाला. तर एसबीआयचा शेअर २.९९ टक्क्यांनी उसळी घेऊन ७१६.०५ पातळीवर बंद झाला.

BELचा शेअर २.८५ टक्क्यांनी उसळी घेऊन २६४.७१ वर बंद झाला. तर Shriram finance च्या शेअरने १.८७ टक्क्यांनी उसळी घेतली. त्यामुळे या शेअरचा भाव ६३२.९० वर बंद झाला. अदानी इंटरप्राइजेजचा शेअर १.३१ टक्क्यांनी उसळी घेऊन २,१४५ पातळीवर बंद झाला. त्यामुळे काही गुंतवणूकादारांना त्याचा फायदा झाला.

टॉप लुझर्स शेअर कोणते?

आज शेअर बाजारात सर्वाधिक घसरण बजाज ऑटोच्या शेअरमध्ये पाहायला मिळाली. बजाज ऑटोचा शेअर ४.९५ टक्क्यांनी घसरून ७,३३३ च्या पातळीवर बंद झाला. Hero motocorp चे शेअर ३.२० टक्क्यांनी कमकुवत होऊन ३,५१५ च्या पातळीवर बंद झाला. बजाज फिनसर्व्हचा शेअर २.६३ टक्क्यांनी घसरून १७९० वर पोहोचला. तर HCL Tech चा शेअर २.३५ टक्क्यांनी घसरून १,५३६ च्या पातळीवर बंद झाला. Eicher Motors चा शेअर १.८७ टक्क्यांनी घसरून ४, ८१५ वर पोहोचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT