Share Market Saam tv
बिझनेस

Share Market Today : सलग नवव्या दिवशी शेअर बाजार घायाळ; गुंतवणूकदारांचे ३००० कोटी बुडाले, कोणते शेअर ठरले टॉप लुझर्स?

Share Market Today update : सलग नवव्या दिवशी शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. आज गुंतवणूकदारांचे ३००० कोटी बुडाले. आज कोणते शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली? जाणून घ्या.

Vishal Gangurde

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण सुरुच आहे. आज सोमवारी सेन्सेक्स ११२ अंकांनी घसरून बंद झाला. तर निफ्टी देखील ५ अंकांनी घसरला. सलग नवव्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.

जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे गुंतवकणूकदार सजग झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज दोन्ही इंडेक्समध्ये सुरुवातीला तेजी पाहायला मिळत होती. त्यानंतर दोन्ही इंडेक्स रेड झोनमध्ये गेले. शेवटच्या काही तासांत बाजारात रिकव्हरी पाहायला मिळाली. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स आज ०.२५ टक्क्यांनी घसरून बंद झाला. तर स्मॉलकॅपमध्ये ०.७० टक्क्यांनी घसरण दिसली. आज दिवसभरात एनर्जी, ऑइल अँड गॅस, बँकिंगच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे आयटी, कॅपिटल गुड्स आणि पॉवरच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.

शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स ११२.१६ अंकांनी म्हणजे ०.१५ टक्क्यांनी घसरून ७३,०८५.९४ अंकांवर बंद झाला. तर एनएसईचे ५० शेअर इंडेक्स, निफ्टी ५.४० अंकांनी घसरून ०.०२४ टक्क्यांनी घसरून २२,११९.३० पातळीवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचे बुडाले ३००० कोटी

बीएसईच्या लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायजेशन आज ३ मार्च रोजी ३८३.९८ लाख कोटींनी घसरला. शुक्रवारी म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी मार्केट कॅपिटलायजेशन ३००० कोटी रुपये होते. बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपची १५००० कोटी रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३००० कोटी रुपयांनी घट झाली आहे.

कोणते शेअर ठरले टॉप गेनर?

बीएसई सेन्सेक्सच्या ३० पैकी १८ शेअर हे हिरव्या रंगात बंद झाले. यात अल्ट्राटेक सीमेंटचा शेअर २.२१ टक्क्यांनी घसरला. भारती एअरटेल, एनटपीसी, बजाज फायनान्सचा शेअरमध्ये १.७६ टक्के ते १.७६ टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली.

सेन्सेक्सचे कोणते शेअर ठरले टॉप लुझर्स?

सेन्सेक्सचे १२ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. यात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २.३८ टक्क्यांनी घसरला. त्यानंतर बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स, मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये १.३७ टक्के ते १.८६ टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT