Scheme news AI Photo
बिझनेस

SCSS benefits: ५ वर्षात २४ लाख, या सरकारी योजनेमुळे व्हाल मालामाल; कोणती आहे ही योजना? पाहा एका क्लिकवर

SCSS joint account benefits: ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळते. SCSS ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा सेवानिवृत्ती निधी सुरक्षित ठेवण्यास आणि सातत्यपूर्ण उत्पन्न मिळविण्यास मदत करते.

Bhagyashree Kamble

केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवतात. यातीलच एक योजना जी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त आहे. ती योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. भारतातील वृद्धांचे हित लक्षात घेत ही योजना राबवण्यात येत आहे. सेवानिवृत्तीनंतर सुरक्षित आणि स्थिर उत्पन्नासाठी या योजनेचा लाभ घेता येऊ शकते. या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे गुंतवणुकीत ८.२ टक्के व्याज मिळते. कमी रक्कमेच्या गुंतवणुकीत व्याजेच्या स्वरूपात उत्तम परतावा मिळतो. आपण या योजनेत जोखीम न घेता गुंतवणूक करू शकता.

किती व्याज मिळते?

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळते. SCSS ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा सेवानिवृत्ती निधी सुरक्षित ठेवण्यास आणि सातत्यपूर्ण उत्पन्न मिळविण्यास मदत करते. ही योजना कशी कार्य करते आणि यातून ज्येष्ठ नागरिकांना कसा फायदा होतो पाहा.

ही योजना कशी कार्य करते?

ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जोडीदारासह किंवा वैयक्तिकरित्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत, प्रत्येक खात्यात जास्तीत जास्त ३० लाख रुपये जमा केले जाऊ शकते. ज्यामध्ये किमान गुंतवणूक १,००० रुपये इतकी आहे. तर १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम चेकद्वारे भरावी लागेल.

योजेनेसाठी वयोमर्यादा किती?

ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. याचा लाभ फक्त ज्येष्ठ श्रेणीतील लोकांनाच मिळेल. यामध्ये ६० वर्षांवरील नागरिक किंवा त्याहून जास्त वयापेक्षा नागरिक स्वतःचे किंवा संयुक्त खाते उघडू शकते. यासह स्वेच्छानिवृत्ती घेणारे संरक्षण कर्मचारीही याचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी संरक्षण कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर १ महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागत होती, मात्र आता हा कालावधी वाढवून ३ महिन्यांचा करण्यात आलाय.

२४ लाख रुपये कसे कमवाल?

सेवानिवृत्त जोडप्यांना स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बचत खाते उघडून जास्तीत जास्त लाभ मिळू शकते. यासाठी ६० लाख रूपये आधी गुंतवावे लागेल. पाच वर्षानंतर ८.२ टक्क्यानुसार २४ लाख रुपये व्याज मिळू शकते. यात तुम्हाला तिमाही व्याज म्हणून ₹ १,३०,३०० मिळू शकते. वार्षिक आधारावर व्याजातून ₹ ४,८१,२०० चे इन्कम मिळेल. त्याचप्रमाणे, पाच वर्षांनी मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर, एकूण ₹ २४,०६,००० चे व्याज प्राप्त होईल.

या योजनेचे वैशिष्ट्य

उत्तम परतावा: ज्येष्ठ नागरिक बचत योजना ८.२% वार्षिक व्याज देते.

सुरक्षितताः ही सरकार-समर्थित योजना आहे. त्यामुळे ठेवींची १००% सुरक्षितता सुनिश्चित करते.

एकाच खात्यात ३० लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केल्यास किती फायदा होईल?

तिमाही व्याजः ₹६०,१५०

वार्षिक व्याज: ₹२,४०,६००

पाच वर्षांत एकूण व्याजः ₹१२,०३,०००

एकूण मॅच्युरिटी रक्कम: ₹४२,०३,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT