
राज्यात अनेक जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांचा वावर वाढलाय. पुण्यात देखील बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अशातच स्वारगेट पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोराकडून बनावट कागदपत्रांचा ढीग जप्त केला आहे. त्याच्याकडे ८ पॅनकार्ड, २ व्होटींग कार्ड, डेबिट कार्ड यांसारखे विविध बनावट कागदपत्रं सापडले आहेत. यासह त्याच्याकडून पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवैत, कतार, युएई आणि मलेशिया या देशांची चलनी नोटा पोलिसांनी जप्त केली आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे आढळल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. एहसान हाफिद शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख हा २००४ सालापासून पुण्यात वास्तव्यास आहे. शेखची झडती घेतली असता त्याच्याकडून ८ पॅनकार्ड, १५ आधारकार्ड, २ मतदान कार्ड, २ ड्रायव्हिंग लायसन्स, ३ पासपोर्ट, ९ डेबिट कार्ड, ८ क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. यासह ३ शाळा सोडल्याचे दाखले, ८ जन्म दाखले जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ ढगे यांनी तक्रार दाखल केली आहे. ढगे हे जुलै २०२४ पासून स्वारगेट पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकामध्ये नेमणुकीस आहेत. पतित पावन संघटना, क्रांतिवीर सेना, सकल हिंदू समाज आदी विविध संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शेख याला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एहसान शेख याचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यानं २०१४ साली भारतात घुसखोरी केली होती. शेख यानं स्वारगेट परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. याबाबत स्वारगेट पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महर्षींनगर परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ओळखपत्र जप्त करण्यात आलं आहे. त्यानं बनावट कागदपत्रे कशी मिळवली? यात आणखीन कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.