Gangapur Crime Case: मुलाचा मृतदेह शासनाने पोहोचवावा; अंत्ययात्रा न काढता अंत्यसंस्कार करा; खंडपीठाचा आदेश

Gangapur: ८ महिन्यांपूर्वी हत्या झालेल्या मुलाचा मृतदेह उकरून शासनाने स्वखर्चाने त्याच्या आईच्या घरी पोहोचवावे. अंत्ययात्रा न काढता प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय.
Court
Court Saam Tv
Published On

गंगापुरात ८ महिन्यांपूर्वी हत्या झालेल्या मुलाचा मृतदेह उकरून शासनाने स्वखर्चाने त्याच्या आईच्या घरी पोहोचवावे. अंत्ययात्रा न काढता प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय. गंगापूर येथील झंपराबाई श्रीमंत भोसले यांनी त्यांचा ३५ वर्षांचा मुलगा रवी हरवल्याची तक्रार मे २०२४ मध्ये गंगापूर पोलिस ठाण्यात दिली होती.

गंगापुरात एक भंयकर हत्येची घटना घडली होती. मे २०२४मध्ये रवी भोसले या व्यक्तीची निर्घृण हत्या करून ६ सहा तुकडे करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे पुरले होते. पुरलेला मृतदेहाचे तुकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी रवीच्या आईची यातायात सुरू होती. पोलीस पुरलेल्या मृतदेहाचे तुकडे देत नसल्यामुळे आईनं थेट न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलासादायक निर्णय दिला.

Court
Guillain-Barré Syndrome: मेंदू व्हायरसचं थैमान, २४ पेशंट व्हेंटिलेटरवर; केंद्राचं पथक पुण्यात

नेवासा तालुक्यातील मुळा धरणात रवीच्या मृतदेहाचे सहा तुकडे सापडले होते. गंगापूर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी झंपराबाईंचे रक्ताचे नमुने घेतले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये डीएनए अहवाल आला. त्यात दोन्ही डीएनए जुळले. पोलिसांनी मे २०२४मध्ये नमुने घेतल्यानंतर मृतदेह पुरून टाकला होता. मयत मुलाचा मृतदेहाचे अवशेष मिळावेत, यासाठी मयताच्या आईनं नेवासाच्या तहसीलदारांकडे अर्ज केला.

Court
Crime News: संशयाचं भूत डोक्यात शिरलं! ७ महिन्याच्या गर्भवतीच्या पोटावर बसून पतीनं केली हत्या

नेवासा तालुक्यातील मुळा धरणात रवीच्या मृतदेहाचे सहा तुकडे सापडले होते. गंगापूर पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी झंपराबाईंचे रक्ताचे नमुने घेतले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये डीएनए अहवाल आला. त्यात दोन्ही डीएनए जुळले. पोलिसांनी मे २०२४मध्ये नमुने घेतल्यानंतर मृतदेह पुरून टाकला होता. मयत मुलाचा मृतदेहाचे अवशेष मिळावेत, यासाठी मयताच्या आईनं नेवासाच्या तहसीलदारांकडे अर्ज केला.

आदेश देणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर झंपराबाई यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर रवीच्या आईनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने मृतदेह शासनाने पोहोचवावा, अंत्ययात्रा न काढता अंत्यसंस्कार करावे असा आदेश दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com