girls scheme google
बिझनेस

girls scheme: शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी खास योजना, महिन्याला मिळतात १००० रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती

kanyashree scheme : मुलींसाठी सरकारने आणली 'कन्याश्री योजना.' सर्व मुलींना मिळणार या योजनेचे पैसे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Saam Tv

'कन्याश्री योजना'

कन्याश्री योजने अंतर्गत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृती दिली जाते. तसेच त्यांना उद्योगासाठी मदत सुद्धा केली जाते. त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत केले जाते. ही योजना पश्चिम बंगाल मध्ये राबवली जाते. तिथे 'कन्याश्री योजना' या नावाने ही योजना राबवली जाते. या योजनेमुळे तिथल्या मुलींना शिक्षण घेता आलं आणि बालविवाहांपासून त्या मुक्त झाल्या. पश्चिम बंगालमध्ये ही योजना ८ मार्च २०१३ पासून आली. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी ही योजना फार महत्वाची भुमिका बजावत आहे.

कन्याश्री योजनेचे पैसे किती मिळतात?

कन्याश्री योजनेचा लाभ १३ ते १८ वयोगटातील मुली घेऊ शकतात. त्यासह आठवी ते पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ही योजना काम करते. यात १८ वर्षाच्या मुलींना २५ हजार पर्यंत शिष्यवृती दिली जाते. तसेच इतर मुलींना १००० रूपये दरमहिना दिले जातात. फॉर्म भरला आहे त्या सगळ्यांना त्यांच्या अकाउंटवर थेट पैसे पाठवले जातात.

अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात?

मुळात ही योजना पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या मुलींसाठी आहे. त्याचसोबत ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारांपेक्षा कमी असलेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. हा फॉर्म भरताना उत्पन्नाचा दाखला लागतो. त्याचसोबत मुलीचा जन्म दाखला, मुलगी अविवाहीत आहे याचा पुरावा. पुढे मुलचे नाव, पत्ता , खाते क्रमांक असलेले पासबूक अशी कागदपत्रे या योजनेसाठी महत्वाची आहेत. या योजनेचा अर्ज तुम्ही www.wbkanyashree.gov.in या वेबसाइटवर भरू शकता. हीच वेबसाइट तुम्ही शिषवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थींनींसाठी वापरून अर्ज भरु शकता.

Edited by: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT