World Autism Awareness Day 2024 : ऑटिझम म्हणजे काय? कोणत्या वयोगटातील मुलांना होतो? जाणून घ्या याची लक्षणे

Autism Disease : जागतिक ऑटिझम जागरुकता दिवस हा दरवर्षी २ एप्रिलला साजरा केला जातो. या दिवशी या आजाराबद्दल अनेकांना जागरुक केले जाते. ज्यामुळे ऑटिझम ग्रस्त लोकांचे जीवन सुधारण्यासाठी समाजात योगदान मिळेल.
Autism Disease, Autism Symptoms
Autism Disease, Autism SymptomsSaam Tv

Autism Symptoms :

जागतिक ऑटिझम जागरुकता दिवस हा दरवर्षी २ एप्रिलला साजरा केला जातो. या दिवशी या आजाराबद्दल अनेकांना जागरुक केले जाते. ज्यामुळे ऑटिझम ग्रस्त लोकांचे जीवन सुधारण्यासाठी समाजात योगदान मिळेल.

हा आजार न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. जो मुलांच्या मेंदूतील बदलांमुळे होतो. ऑटिझम म्हणजे काय? हा आजार (Disease) कसा होतो? याची लक्षणे (Symptoms) कोणती? जाणून घेऊया.

1. ऑटिझम म्हणजे काय?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, ऑटिझम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. जो मुलांच्या मेंदूतील बदलांमुळे होतो. त्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असे म्हणतात. मुलांची वागणूक, संभाषण आणि शिकण्याची शैली इतर मुलांपेक्षा (Child) वेगळी असते.

Autism Disease, Autism Symptoms
High Cholesterol कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल दही, या पद्धतीने आहारात करा वापर

ऑटिझम असलेल्या मुलांना शारीरिक हालचाली आणि बोलण्यात अडचणी येऊ शकतात. हा आजार साधारणपणे २-३ वर्षाच्या वयात आढळून येतो. यासाठी काही टेस्ट कराव्या लागतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार जगभरातील १०० पैकी १ मुलाला ऑटिझम आहे.

ऑटिझम ग्रस्त मुलांना लोकांशी संवाद साधण्यात अडचण येऊ शकते. त्यांना समोरच्या व्यक्तीची देहबोली समजण्यात अडचण येऊ शकते. ज्यामुळे त्यांना समोरची व्यक्ती काय बोलते हे समजण्यास अडचण येते. तसेच भाषा समजण्यास अडचण, लोकांशी कनेक्ट होण्यास अडचण, एकच गोष्ट सतत करणे, एखाद्या गोष्टीत बदल केल्यास न आवडणे. ही लक्षणे ऑटिझम मुलांमध्ये दिसून येतात.

Autism Disease, Autism Symptoms
Workout Skincare : वर्कआउट करताना या चुका करु नका, त्वचेवर होईल गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

2. ऑटिझम का होतो?

ऑटिझमचे कोणतेही विशिष्ट कारण सापडले नाही. हा आनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश असू शकतो.

3. लक्षणे काय?

  • एकच क्रिया पुन्हा पुन्हा करणे, जसे की बसून हालचाल करणे, हात हलवणे, तोच शब्द पुन्हा पुन्हा सांगणे

  • संवेदना अधिक संवेदनशील होतात. मोठ्या आवाजामुळे त्रास होणे किंवा चिडचिड होणे

  • लोकांकडे न बघणे किंवा बोलताना डोळे मिचकावणे, लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करणे

  • शारीरिक स्पर्श नापसंत, रोबोटिक आवाजात बोलणे, विशिष्ट गोष्टीमध्ये अधिक रस, हावभाव समजण्यास अडचण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com