Top 5 Sarkari Naukri Last Date: आजच फॉर्म भरा! अन्यथा सरकारी नोकरीची संधी हुकेल, 5 ठिकाणी अर्ज करण्याची तारीख आली जवळ!

Weekly Top 5 Govt Jobs: सप्टेंबर महिना सुरू झाल्याने या आठवड्यात शेवटची तारीख असलेल्या काही सरकारी नोकऱ्यांची लिस्ट आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
Weekly Top 5 Govt Jobs
Top 5 Sarkari Naukri Last DateSaam TV
Published On

सरकारी नोकरी मिळावी यासाठी लाखो तरुण प्रयत्न करत आहेत. अशात आजपासून सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्याने या आठवड्यात शेवटची तारीख असलेल्या काही सरकारी नोकऱ्यांची लिस्ट आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. आता तुम्हाला या सरकारी नोकरीबद्दल माहिती मिळाली नसेल आणि तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरला नसेल तर आजच हा फॉर्म भरू शकता.

Weekly Top 5 Govt Jobs
Job Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 62 हजार मिळणार पगार, 283 पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु

BHU IMS 2024

वाराणसी हिंदू विश्वविद्यालयमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये सीनिअर रेसिडेंट पदासाठी जागा शिल्लक आहे. या परीक्षेसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. पात्र उमेदवाराने फॉर्म भरण्यासाठी BHU च्या www.bhu.ac.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२४ आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी BHU IMS Vacancy 2024 Notification तपासा.

UPSC भरती 2024

UPSC मार्फत उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ आणि केबिन सुरक्षा निरीक्षक (Deputy Superintending Archaeologist and Cabin Safety Inspector) या दोन पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. त्यामध्ये सध्या 82 जागा रिक्त असल्याचं समजलं आहे. या रिक्त जागांवर तुम्ही आजही फॉर्म भरू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख येथे 5 सप्टेंबर आहे.

IAF Agniveer Recruitment 2024

वायुसैन्यात ज्या विद्यार्थ्यांना भरती व्हायचे आहे त्यांच्यासाठी IAF अग्निवीर भरती 2024 सुरू आहे. तुम्ही अद्याप येथे अर्ज केला नसेल तर आजच अर्ज करू शकता. येथे हाउसकिपींग आणइ नॉन कॉम्बॅटेंट पदांसाठी भरती सुरू आहे. 17 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याची शेवटची तारीख २ सप्टेंबर आहे. फॉर्म भरण्यापूर्वी याची जाहिरात पाहून घ्या.

CMPFO Recruitment 2024

CMPFO मध्ये देखील विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यामध्ये ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर आणि सोशल सिक्युरीटी असिस्टंट पदासाठी भरती सुरू आहे. 6 सप्टेंबरपर्यंत या पदासाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीबाबत सर्व माहिती जाहिरातीमध्ये देाण्यात आली आहे. जाहिरात वाचून पात्र उमेदवार येथे ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

MP Bank Jobs 2024

लाखो तरुण बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. सध्या मध्य प्रदेश राज्य सहकारी बँक लिमिटेडमध्ये काही पदांच्या जागा भरल्या जात आहेत. त्यात बँकिंग असिस्टंट, असिस्टंट मॅनेजर, बँक कॅडर ऑफिसर अशी पदे आहेत. येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर आहे.

Weekly Top 5 Govt Jobs
Government Job Vacancy 2024: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; २ लाख रुपये मासिक वेतन मिळणार; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com