SBI Home Loan Saam Tv
बिझनेस

SBI Home Loan: एसबीआयचा लाखो ग्राहकांना दिलासा, व्याजदरात केली कपात, किती पैसे वाचणार?

SBI Interest Rate Decreases after Repo Rate: रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर आता स्टेट बँकेनेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने व्याजदरात कपात केली आहे.

Siddhi Hande

स्टेट बँकेचा मोठी निर्णय

आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंकर स्टेट बँकेने व्याजदर घटवले

कर्जदारांना होणार फायदा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली. रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी केले. आता स्टेट बँक ऑफ इंडियानेदेखील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे.

५ डिसेंबर रोजी आरबीआयने रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सने कमी करुन ५.२५ टक्क्यांवर आणले. यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदाने व्याजदर कमी केले. त्यानंतर आता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेनेही कर्जदारांना दिलासा दिली आहे.

स्टेट बँकेने एक्सटर्नल बेंच मार्क लिंक्ड रेट २५ बेसिस पॉइंट्सने कमी केला आहे. हा दर आता ७.९० टक्क्यांवर आला आहे. स्टेट बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिग रेटमध्येही कपात केली आहे. हे दर ५ बेसिस पॉइंट्सने कमी केले आहे. त्यामुळे हे दर ८.७५ टक्क्यांवरुन ८.७० टक्क्यांवर आले आहे.

बँकेचे हे नवीन दर १५ डिसेंबरपासून लागू केले जाणार आहे.स्टेट बँकेने बेस रेट आणि बीपीएलआर १० टक्क्यांवरुन ९.९० टक्के केला आहे. तसेच एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. २ ते ३ वर्षांच्या ठेवीसाठी व्याजदरात कपात केली आहे.

चौथ्यांदा रेपो रेट कमी (Repo Rate Decrease for Fourth Time)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षभरात रेपो रेटमध्ये १२५ बेसिस पॉइंट्सने कपात केली. मागच्या आठवड्यात चौथ्यांदा रेपो रेट कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेची दर दोन महिन्यांनी पतधोरण बैठक होते. सुरुवातीला दोनदा रेपो रेटमध्ये कपात केली. यानंतर तिसऱ्यांना ५० बेसिस पॉइंट्सने कपात केली.

गृह कर्जदारांना दिलासा

रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर स्टेट बँकेनेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे गृह कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. त्यांचा कर्जावरील ईएमआय कमी होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

किती पैसे वाचणार

५० लाखांच्या होम लोनवर २० वर्षांच्या कालावधीसाठी याआधी ८.१५ टक्के व्याजदर द्यावे लागत होते. आता हे दर ७.९० टक्के झाले. जुन्या व्याजदरानुसार ईएमआय ४२,२९० रुपये दर महिन्याला येत होता. आता तुम्हाला फक्त ४१,५११ रुपये ईएमआय भरावा लागणार आहे. तुमचे ७७९ रुपये वाचणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठरलं! मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार? महाविकास आघाडीचं काय होणार? VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार - वर्षा गायकवाड

New cricket stadium: अमेरिकेच्या भूमीवर क्रिकेटचा नवा अध्याय; ला-ग्रेंजमध्ये भव्य क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन

कुठल्या उमेदवाराला किती खर्च मर्यादा? अ, ब, क, ड वर्गात कोणत्या २९ महापालिका? निवडणूक आयोगाकडून A टू Z माहिती

Pune: ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मावळमध्ये संतापाची लाट; आरोपीला फाशी द्या, गावात कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT