SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची संधी, २६०० पदांसाठी भरती, अर्ज करण्याची मुदत वाढली

SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सर्किल बेस्ड ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.
SBI Recruitment
SBI RecruitmentSaam Tv
Published On

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत सर्किल बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जून देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

SBI Recruitment
Bank Jobs: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ४०० पदांसाठी निघाली भरती, पगार ८५९२० रुपये, जाणून घ्या सविस्तर

स्टेट बँकेतील सर्किल बेस्ड ऑफिसर पदासाठी तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. यानंतर डायरेक्ट लिंकवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही प्रिंट आउट काढण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२५ आहे.

या भरती मोहिमेत अर्ज करण्यासाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. मेडिकल इंजिनियरिंग/ इंजिनियरिंग / सीए पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २१ ते ३० मध्ये असावी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्जप्रक्रिया

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही ibpsonline.ibps.in/sbicboapr25/ या वेबसाइटला भेट द्या.

त्यानंतर Click here for New Registration वर जा.

यानंतर दिलेली संपूर्ण माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही सही आणि फोटो अपलोड करा.

यानंतर निर्धारित शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

SBI Recruitment
NICL Recruitment: ग्रॅज्युएट आहात? NICL मध्ये सरकारी नोकरीची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

भरती

स्टेट बँकेतील ही भरती २९६४ पदांसाठी केली जाणार आहे.यातील २६०० पदे रेग्युलर पोस्टसाठी असणार आहेय २६५ पदे बॅकलॉगसाठी असणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

SBI Recruitment
Union Bank Job: युनियन बँकेत नोकरीची संधी, मिळणार भरघोस पगार, अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com