SBI Bank News  Saam Tv
बिझनेस

SBI Har Ghar Lakhpati Scheme: स्टेट बँकेची हर घर लखपती योजना! महिन्याला फक्त ५९१ रुपये गुंतवून मिळणार लाखो रुपये

SBI Har Ghar Lakhpati Scheme: स्टेट बँकेने हर घर लखपती योजना सुरु केली आहे. या योजनेत ग्राहक आपल्या इच्छेनुसार किती रक्कम किती कालावधीसाठी गुंतवायची हे ठरवू शकतात.

Siddhi Hande

स्टेट बँकेची हर घर लखपती योजना

योजनेत गुंतवणूकीची रक्कम आणि कालावधी ग्राहकांनी ठरवायचा

प्रत्येकजण होणार लखपती

प्रत्येकजण आपापल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक अडचण भासत नाही. दरम्यान, यासाठीच स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कस्टमाइज्ड रिकरिंग डिपॉझिट प्रोडक्ट देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेत ग्राहक त्यांच्या मर्जीनुसार पैसे जमा करु शकतात. कमीत कमी रक्कम गुंतवून ते लखपती होऊ शकतात.

स्टेट बँकेची हर घर लखपती योजना (SBI Har Ghar Lakhpati Yojana)

स्टेट बँकेच्या हर घर लखपती योजनेअंतर्गत तुम्ही १ लाखांपर्यंत पैसे जमा करु शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दर महिन्याला पैसे जमा करु शकतात. याचसोबत हे पैसे किती कालावधीसाठी गुंतवायचे आहे हेदेखील तुम्ही ठरवू शकतात. अशा प्रकारे कमीत कमी रक्कम गुंतवून तुम्ही लाखो रुपये मिळवू शकतात.

हर घर लखपती योजनअंतर्गत सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांच्या आतील मुलांचेदेखील अकाउंट ओपन करु शकतात. या योजनेचा गुंतवणूकीचा कालावधी ३ ते १० वर्षांचा असतो.

व्याजदर किती?

हर घर लखपती योजनेत चांगले व्याजदर मिळते. या योजनेत वर्षाला ६.५० ते ६.७५ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला ५९१ रुपये गुंतवले तर तुम्हाला १ लाख रुपये मिळतील. या योजनेत जर तुम्ही सलग ६ हप्ते भरले नाही तर अकाउंट बंद केले जाते.

अनेकांना गुंतवणूक करताना कोणतीही रिस्क घ्यायची नसते. त्यामुळे त्यांना लखपती होण्याची ही उत्तम संधी आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही पगारातील लहान अमाउंट गुंतवू शकतात. तुम्हाला यावर चांगले व्याजदर मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोवंडीमध्ये पिता-पुत्र निवडणुकीच्या रिंगणात

Pune Municipal Corporation Election: अखेरच्या दिवशी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं; कोण किती जागांवर लढणार? फॉर्म्युला आला समोर

Maharashtra Politics : मोठी राजकीय घडामोड! राज ठाकरे अचानक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, कारण काय?

आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण? संपूर्ण पुण्यात जोरदार चर्चा

Alcohol Fact: दारु प्यायल्यावर अनेकांना जुनी नाती का आठवतात? कारण वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT