सध्या अनेक वाहनधारकांकडे फास्टटॅग सुविधा आहे.फास्टटॅगमुळे अनेकदा टोल नाक्यावर रांगेत उभे राहावे लागत नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळ वाचतो. परंतु अनेकदा फास्टटॅग हे व्यवस्थित स्कॅन होत नाही. त्यामुळे कारचालकांचा बराच वेळ टोल नाक्यावरच जातो. त्यामुळेच आता स्टेट बँक ऑफ इंडियाने फास्टटॅगचे नवी डिझाइन समोर आणले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन फास्टटॅगमुळे टोल भरणे सोपे आणि सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे फास्टटॅग लगेच स्कॅन होईल आणि कोणतीही अडचण येणार नाही. ही नवीन डिझाइन कार, जीप किंवा व्हॅनसाठी बनवण्यात आली आहे. यामुळे टोल देण्याची प्रोसेस आधीपेक्षा कमी होणार आहे.
SBI FASTag हे एक डिव्हाइस आहे ज्यात रेडिओ फ्रिक्वेंसी ऑयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे टोलचे पेमेंट थेट प्रीपेड किंवा सेव्हिंग अकाउंटवरुन होणार आहे. हा फास्टटॅग कारच्या विंडस्क्रिनवर लावण्यात येणार आहे. यामुळे टोल नाक्यावर जास्त वेळ थांबावे लागणार नाही.
टोल घेण्याची प्रोसेस अजून लवकर व्हावी, या उद्देशाने हे नवीन एसबीआय फास्टटॅग बनवण्यात आले आहे. हे नवीन फास्टटॅग ३० ऑगस्ट २०२४ पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे.
नवीन फास्टटॅग डिझाइनमुळे टोल भरणे खूप सोपे होणार आहे.
टोलवर पेमेंट खूप कमी वेळात होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना जास्त वेळ टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही.
चुकीचा टोल चार्जच्या समस्या दूर करण्यासाठी हे नवीन डिझाइन मदत करेल. यामुळे टोल ऑपरेटर्सचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.