ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच काही नियमांमध्ये बदल झाले आहेत. त्यात फास्टॅगमध्येही काही बदल झालेले आहे. फास्टटॅगच्या केवायसीसंदर्भात नवीन नियम लागू लागू करण्यात आले आहे. यामध्ये केवायसी अपडेट करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने नवीन निर्देश जारी केले आहेत. ज्यात केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर असल्याचे सांगण्यात आले आहे.ज्या वाहनांचे फास्टटॅग काढून ३- ५ वर्ष पूर्ण झाली आहे त्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करताना तुमच्या वाहनाची प्रत्येक माहिती ही फास्टटॅगसोबत लिंक असणे गरजेचे आहे.
NPCI ने दिलेल्या सूचनेनुसार, १ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणाऱ्या सर्व नियमांचे पालन करुनच केवायसी करायचे आहे. प्रत्येक फास्टटॅग हा एका मोबाईल नंबरशी जोडलेला असावा. केवायसी करताना आपलाच नंबर आपल्या वाहनाच्या फास्टटॅगला जोडला गेला आहे का याची खात्री करुन घ्या. प्रत्येक फास्टटॅगला एक वेगळा आपल्या वाहनाचा VRN नंबर लिंक असेल. नवीन वाहनांसाठी VRN नंबर उपलब्ध नाही आहे. परंतु त्यासाठी चेरिस नंबर देण्यात आला आहे. या नंबरवरुन तुम्ही केवायसी करु शकतात.
FASTag युजर्सने मुदतीपूर्वी केवायसी पूर्ण न केल्यास तुमचे फास्टटॅग बंद करण्यात येईल. देशभरातली लोकांना FASTag युजर्सच वापर अधिक सुरक्षित व्हावा यासाठी हा NPCI ने पाऊल उचलले आहे. फास्टटॅग घेणाऱ्या ग्राहकांना ९० दिवसांच्या आत त्यांना VRN नंबर अपडेट करावा लागेल. जर तुमचा VRN नंबर ३० दिवसांच्या आता अपडेट झाला नाही तर तुमचा फास्टटॅग बंद होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.