Mukhyamantri Annapurna Yojana : गृहिणींसाठी खूशखबर! मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत मोफत मिळणार ३ सिलिंडर , कोण असणार पात्र? काय आहेत अटी आणि नियम?

Ladki Bahin beneficiaries : राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जारी केली आहे. याचा प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२,१६,००० हजार लाभार्थ्यांना लाभ.मिळणार आहे. तसंच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
Mukhyamantri Annapurna Yojana
Mukhyamantri Annapurna YojanaSaam Digital
Published On

मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि विद्यावेतन योजनेनंतर आता राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जारी केली आहे. या योजनेंचा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना लाभ. मिळणार आहे. तसंच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेसाठी कोण पात्र असणार आणि कुठे अर्ज करता येईल, याविषयी जाणून घेऊयात.

Mukhyamantri Annapurna Yojana
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे? महिलांना दरमहा किती रुपये मिळणार, जाणून घ्या; VIDEO

काय आहेत अटी?

गॅस जोडणी असणाऱ्या महिला लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार

योजनेसाठी एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी पात्र असेल

एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर एका महिन्यात मिळणार नाहीत

१४.२ कि.ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच याचा लाभ मिळेल

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिला योजनेसाठी पात्र असतील

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत पात्र असलेल्या ५२.१६ लाख महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्थसंकल्पात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करून महिलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. या योजनेतील लाभार्थ्यांना आणखी लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्या संदर्भातील शासन निर्णय आज (३० जुलै) सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे? महिलांना दरमहा किती रुपये मिळणार, जाणून घ्या; VIDEO

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल ३ कोटीच्या आसपास महिला पात्र ठरण्याचा अंदाज आहे. दरम्यान मागच्या आठवड्यापर्यंत एक कोटी अर्ज आले होते. मात्र अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँक खाते नाही, आधार कार्ड बँक खात्यासोबत आणि मोबाईलसोबत लिंक नाही, अशा तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana
Konkan Railway : अरे देवा, गणपतीक कोकणात जावचा कसा? रस्ते खड्डेबंबाळ अन् रेल्वे बुकिंगही ५ मिनिटांत फुल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com