Hero ची नवीन E Bike, 70KM मायलेज आणि किंमत फक्त 35000 रुपये, मिळणार 'हे' जबरदस्त फीचर्स

Hero Electric A2B May Launch soon: तरुणांना पेडलसह येणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक्स आवडतात. या सेगमेंटमध्ये Hero ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक A2B आणली आहे.
Hero ची नवीन E Bike, 70KM मायलेज आणि किंमत फक्त 35000 रुपये, मिळणार 'हे' जबरदस्त फीचर्स
Hero Electric A2BSaam Tv
Published On

भारतीय दुचाकी बाजारात ई-बाईकची क्रेझ वाढत आहे, तरुणांना पेडलसह येणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक्स आवडतात. या सेगमेंटमध्ये Hero ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक A2B आणली आहे. विशेष म्हणजे ही एक हलक्या वजनाची बाईक आहे, ज्याला चालवण्यासाठी कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही आणि याची कुठेही नोंदणीही करावी लागणार नाही. लहान मुले, वृद्ध आणि महिला दैनंदिन घरगुती कामासाठी ही सहजपणे चालवू शकतात. याच्याच फीचर्स, मायलेज आणि किंमतबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

4 तासांमध्ये चार्ज आणि 45kmph चा टॉप स्पीड

Hero Electric A2B मध्ये हाय पॉवर 5.8 Ah बॅटरी आहे. खराब रस्त्यांवर ही बाईक हाय परफॉर्मन्स देते. ही बाईक 45kmph चा टॉप स्पीड देईल, असं बोललं जात आहे. यामध्ये बॅटरी व्यतिरिक्त, राइडिंगसाठी पेडल देखील दिलेले आहेत. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही 70kmpl पर्यंत धावते, अंस कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीचा दावा केला आहे की, 4 ते 5 तासात ही फुल चार्ज होते.

Hero ची नवीन E Bike, 70KM मायलेज आणि किंमत फक्त 35000 रुपये, मिळणार 'हे' जबरदस्त फीचर्स
90 KM ची रेंज आणि 55799 रुपये किंमत, पुरुषांसह महिलांसाठी बेस्ट आहे 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर

Hero Electric A2B किंमत आणि स्पेसिफिकेशन

हिरो इलेक्ट्रिक ए2बी मार्केटमध्ये एव्हॉन ई स्कूट, वेलेव्ह मोटर्स VEV 01, लोहिया ओमा स्टार, पोलॅरिटी स्मार्ट एक्झिक्युटिव्ह यांच्याशी स्पर्धा करते. सध्या कंपनीने याच्या डिलिव्हरीची तारीख जाहीर केलेली नाही. या वर्षाच्या अखेरीस ही सादर केली जाईल, असा अंदाज आहे.

याची प्रांभिक किंमत 35000 रुपये एक्स-शोरूममध्ये असू शकते. या ई-बाईकला वायर स्पोक व्हील देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही आणखी आकर्षित दिसते. यात सेफ्टीसाठी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

Hero ची नवीन E Bike, 70KM मायलेज आणि किंमत फक्त 35000 रुपये, मिळणार 'हे' जबरदस्त फीचर्स
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 165km ची जबरदस्त रेंज देणाऱ्या EV वर मिळत आहे 40000 ची सूट

सध्या ही ई-बाईक जागतिक बाजारपेठेत उपलब्ध आहे. या बाईकमध्ये एक साधा हँडलबार आहे, ज्यामुळे रायडरला अनेक तास बाईक चालवल्यानंतरही थकवा जाणवत नाही. दिसायलाही बाईक खूपच आकर्षित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com