SBI Scheme Saam TV
बिझनेस

SBI Scheme : ४४४ दिवसांत मोठा फायदा, एसबीआयची खास FD स्कीम, सुरक्षित गुंतवणूक अन् भरघोस रिटर्न

SBI Amrit Vrishti Yojana: स्टेट बँक ऑफ इंडियाची ४४४ दिवसांची खास एफडी योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.

Siddhi Hande

SBI Scheme News: देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियाने नागरिकांसाठी अमृत वृष्टी योजना सुरु केली आहे. अमृत वृष्टी ही फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु केली आहे. या योजनेत नागरिकांना चांगला परतावा मिळतो. स्टेट बँक ऑफ इंडियाची योजना १६ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात आली होती. या योजनेत तुम्ही ३१ मार्च २०२५ पर्यंत गुंतवणूक करु शकतात. (SBI Amrit Vrishti Yojana)

स्टेट बँकेची ही टर्म डिपॉझिट योजना आहे. या योजनेचा कालावधी ४४४ दिवसांचा आहे. या योजनेत तुम्हाला कमीत कमी दिवसांत चांगला परतावा मिळतो.या योजनेत सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के व्याज मिळते.तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ रुपये व्याजदर मिळते. (SBI scheme)

स्टेट बँकेची अमृत वृष्टी ही फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे. या योजनेत तुम्ही ३ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही कमीत कमी १,००० रुपये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्हाला महिन्याला, तीन महिन्याला आणि सहा महिन्याला व्याजदर मिळते.

या योजनेत जर तुम्ही जर मुदतीआधी पैसे काढले तर तुम्हाला पेनल्टी भरावी लागू शकते. ५ लाखांपर्यंतच्या डिपॉझिटवर ०.५० टक्के पेनल्टी द्यावी लागणार आहे. ५ ते ३ कोटींपर्यंत पैसे असतील तर तुम्हाला १ टक्के पेनल्टी द्यावी लागेल. जर तुम्ही ७ दिवसांच्या आता पैसे काढले तर तुम्हाला त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार आहे. स्टेट बँकेचे स्टाफ आणि पेंशनर्सला या योजनेत पेनल्टीपासून सूट आहे.

या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेवर लोन घेऊ शकतात. याचसोबत व्याजावर टीडीएस कापला जाईल. या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळणार आहे. या योजनेत तुम्ही बँकेत जाऊन अर्ज करु शकतात.तसेच तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT