बिझनेस

Samsung Galaxy S25 FE: सॅमसंगचा मेगा लाँचिंग शो, आयफोन १७ आधी नवीन प्रीमियम स्मार्टफोन होणार लाँच, जाणून घ्या दमदार फिचर्स

Samsung Event 2025: सॅमसंग ४ सप्टेंबरला आपल्या नवीन स्मार्टफोनसोबत टॅबलेटही लाँच करू शकते. ही घोषणा अॅपलच्या ९ सप्टेंबरच्या आयफोन १७ मालिकेच्या कार्यक्रमाच्या पाच दिवस आधी होणार आहे.

Dhanshri Shintre

  • सॅमसंगचा मोठा कार्यक्रम ४ सप्टेंबरला होणार

  • गॅलेक्सी एस२५ एफई, टॅब एस११ सीरीज लाँच होण्याची शक्यता

  • एस२५ एफईमध्ये प्रगत कॅमेरा, एमोलेड डिस्प्ले आणि ४९०० एमएएच बॅटरी

  • किंमत अंदाजे ५७ हजार रुपये पासून सुरू होऊ शकते

ॲपलच्या आयफोन १७ सिरीजच्या लाँचिंगला फक्त पाच दिवस शिल्लक असताना सॅमसंगने आपल्या मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. कंपनी ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात नवीन स्मार्टफोनसह प्रीमियम एआय टॅबलेट्सची ओळख करून देणार आहे. यासाठीचे अधिकृत आमंत्रण सॅमसंगकडून जारी करण्यात आले असून, तंत्रज्ञानप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सॅमसंगने या कार्यक्रमात गॅलेक्सी एस२५ कुटुंबातील एका नवीन सदस्याला सादर करण्याची तयारी केली आहे. यासोबतच गॅलेक्सी टॅब एस११ आणि गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्रा देखील लाँच होण्याची शक्यता आहे. तथापि, कंपनीने किती डिव्हाइसेस बाजारात आणणार याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. काही तज्ज्ञांच्या मते, या कार्यक्रमात ट्राय-फोल्ड फोनची झलक मिळण्याची शक्यता आहे, मात्र यावर अद्याप ठोस खात्री देता येत नाही.

गॅलेक्सी एस२५ चे वैशिष्ट्ये

गॅलेक्सी एस२५ एफईच्या संभाव्य वैशिष्ट्यांबाबत माहिती समोर येऊ लागली आहे. यात ६.७ इंचाचा डायनॅमिक एमोलेड २एक्स डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. त्याच्या सुरक्षिततेसाठी गोरिल्ला ग्लास व्हिक्टस दिला जाऊ शकतो. कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास, यात ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी लेन्स, ८ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Samsung Galaxy S25 FE ची किंमत किती?

बॅटरीच्या दृष्टीने हा फोन ४९०० एमएएच क्षमतेसह लाँच केला जाऊ शकतो. त्यात एक्सिनोस २४०० प्रोसेसर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १६ आधारित वन यूआय ८ सह बाजारात येणार असून, कंपनी ७ वर्षांची ओएस आणि सुरक्षा अपडेट्स उपलब्ध करून देईल. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, गॅलेक्सी एस२५ एफईची सुरुवातीची किंमत $६४९.९९ (सुमारे ५७ हजार रुपये) असू शकते, जी १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी असेल. तंत्रज्ञान क्षेत्रातील या दोन मोठ्या कार्यक्रमांमुळे एकीकडे ॲपलचा आयफोन १७ तर दुसरीकडे सॅमसंगची गॅलेक्सी मालिका स्मार्टफोन यूजर्ससाठी सप्टेंबर महिना अत्यंत रोमांचक ठरणार आहे.

सॅमसंगचा कार्यक्रम कधी होणार आहे?

४ सप्टेंबर रोजी सॅमसंगचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात काय लाँच होणार आहे?

गॅलेक्सी एस२५ एफई स्मार्टफोन, गॅलेक्सी टॅब एस११ आणि टॅब एस११ अल्ट्रा लाँच होण्याची शक्यता आहे.

गॅलेक्सी एस२५ एफईची खास वैशिष्ट्ये कोणती असतील?

यात ६.७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले, ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, ४९०० एमएएच बॅटरी आणि एक्सिनोस २४०० प्रोसेसर मिळू शकतो.

गॅलेक्सी एस२५ एफईची किंमत किती असू शकते?

या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे ५७ हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: जरांगे पाटील यांनी सांगितले तरच जेवणाच्या गाड्या बाहेर काढू; मराठा आंदोलकांची भूमिका

Daily Steps: वयाप्रमाणे रोज किती पावले चालणे आवश्यक आहे? जाणून घ्या

Maratha Protester: सीएसएमटीवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त; RAF-SRPF फोर्स दाखल, आंदोलनस्थळी परिस्थिति काय ? VIDEO

अवघ्या ५ मिनिटांत दूर होईल दातदुखी; 'हे' घरगुती उपाय करून पाहाच

Viral Video: डान्स करताना स्टेजवरच कोसळला; विधानसभेत घडली धक्कादायक घटना; VIDEO

SCROLL FOR NEXT