इंटरनेटशिवाय *99# डायल करून UPI व्यवहार करता येतो.
ही सेवा स्मार्टफोनसह कीपॅड मोबाईलवरही उपलब्ध आहे.
अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही, सेवा २४ तास सुरू असते.
HDFC, SBI, ICICI, PNB, अॅक्सिस व बँक ऑफ बडोदा यांसारख्या बँका सुविधा देतात.
अलिकडच्या काळात ऑनलाइन व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, बहुतांश लोक आता UPI चा वापर करताना दिसतात. ग्रामीण भाग असो किंवा शहर, लोकांनी रोख रक्कम वापरणे कमी केले आहे आणि डिजिटल पेमेंटचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला आहे. मात्र, कमी नेटवर्क किंवा इंटरनेट नसलेल्या ठिकाणी पेमेंट करणे कठीण ठरते. अशा वेळी अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते.
यावर उपाय म्हणून आता इंटरनेटशिवायदेखील UPI पेमेंट करणे शक्य झाले आहे. यासाठी तुमच्या मोबाईलवर *99# डायल करून सहज व्यवहार करता येतो. या सुविधेत भाषा निवडल्यानंतर पैसे पाठवा हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर प्राप्तकर्त्याचा UPI आयडी, मोबाईल नंबर किंवा बँक खात्याचा तपशील टाकून रक्कम भरता येते. शेवटी, UPI पिन टाकल्यानंतर पेमेंट पूर्ण होते.
या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंटरनेट नसतानाही व्यवहार करता येतो. केवळ स्मार्टफोनच नाही तर सामान्य कीपॅड मोबाईलवरूनही पैसे ट्रान्सफर करणे शक्य आहे. कोणतेही अॅप इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नसल्यामुळे ही सेवा अधिक सोयीची ठरते. शिवाय, ही सुविधा २४ तास उपलब्ध असल्यामुळे यूजर्सना कधीही व्यवहार करता येतात.
सध्या ही सेवा देशातील प्रमुख बँकांकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात HDFC बँक, SBI, ICICI बँक, अॅक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे. त्यामुळे आता इंटरनेट नसतानाही ग्राहकांना सहज आणि सुरक्षित पद्धतीने डिजिटल व्यवहार करता येणार आहेत.
इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसे करावे?
मोबाईलवर *99# डायल करा, भाषा निवडा, पैसे पाठवा पर्याय निवडा, प्राप्तकर्ता तपशील टाका, रक्कम भरा आणि UPI पिन टाकून व्यवहार पूर्ण करा.
या सुविधेचा मुख्य फायदा काय आहे?
इंटरनेट नसतानाही व्यवहार करता येतो. अगदी कीपॅड मोबाईलवरूनही UPI पेमेंट करता येते.
कोणत्या बँका ही सेवा देतात?
HDFC, SBI, ICICI, अॅक्सिस बँक, PNB आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या प्रमुख बँका ही सुविधा देतात.
ही सेवा कधी उपलब्ध असते?
ही सेवा २४*७ उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही कधीही व्यवहार करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.