First wireless 8K Projector Saam Tv
बिझनेस

QLED 8K Projector: घरातच मिळणार सिनेमागृहाचा आनंद! सॅमसंगने लॉन्च केला पहिला वायरलेस 8K प्रोजेक्टर

साम टिव्ही ब्युरो

First wireless 8K Projector:

सॅमसंगने २०२४ सालचा आपला स्मार्ट टीव्ही लाइन-अप सादर केला आहे. यावेळी कंपनीने एआयवर चालणारे स्मार्ट टीव्ही लॉन्च केले आहेत. कंपनीने हे टीव्ही त्यांना वेगवेगळ्या स्क्रीन साइजमध्ये लॉन्च केले आहे. यासोबतच ब्रँडने पारदर्शक डिस्प्ले सादर केला आहे.

यामध्ये मायक्रो एलईडी चिप्सचा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारचा अनुभव देणारा हा पहिलाच डिस्प्ले आहे. याशिवाय कंपनीने 8K रिझोल्यूशन असलेला प्रोजेक्टर लॉन्च केला आहे. हा प्रोजेक्टर वायरलेस कनेक्टिव्हिटीसह येतो. सॅमसंग निओ क्यूएलईडी टीव्हीमध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सॅमसंग निओ क्यूएलईडी टीव्हीमध्ये काय आहे खास?

निओ क्यूएलईडी टीव्ही सीरिजमध्ये कंपनीने सॅमसंगचा नवा एनक्यू ८ एआय जेन ३ प्रोसेसर दिला आहे. यात वापरण्यात आलेला एनपीयू मागील व्हर्जनपेक्षा दुप्पट वेगवान आहे. सॅमसंगच्या २०२४ सालच्या ओएलईडी टीव्हीमध्ये एस ९५ डी प्रोसेसर आहे. हा टीव्ही ७७ इंचापर्यंतच्या आकारात उपलब्ध असेल. हा टेलिव्हिजन स्क्रीन 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. यात ओएलईडी डिस्प्ले मिळेल, जो ग्लेअर फ्री टेक्नॉलॉजीसह येईल. (Latest Marathi News)

एआय फिचर्स

स्मार्ट टीव्ही एअर इन्फिनिटी डिझाइनसह येणार आहेत. या सीरिजमध्ये एआयशी संबंधित अनेक फीचर्स मिळणार आहेत. हा टीव्ही 8के एआय अपस्केलिंग प्रो फीचरसह येतील.

याशिवाय एआय मोशन एन्हान्सर प्रो आणि रिअल डेप्थ एन्हान्सर प्रो सारखे फीचर्स मिळणार आहेत. या डिव्हाइसमध्ये टायझेन ओएस 2024 मिळेल, जे सॅमसंग गेमिंग हब अॅक्सेसरीज, मोबाइल स्मार्ट कनेक्ट, मल्टी कंट्रोल, 360 ऑडिओ आणि इतर फीचर्ससह येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

SCROLL FOR NEXT