Samsung Galaxy M35 Google
बिझनेस

6GB रॅम अन् 6000mAh बॅटरीसह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy M35;जाणून घ्या फीचर्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सॅमसंग ही देशातील आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. सॅमसंग कंपनी नेहमी नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. सॅमसंग कंपनी लवकरच आपला Samsung Galaxy M35 स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन उत्तम फीचर्ससह लाँच होणार आहे. या स्मार्टफोनचा पहिला लूक समोर आला आहे.

Samsung Galaxy M35 स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 6000mAh बॅटरी असेल. या फोनमध्ये अनेक नवीन अपडेट देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन Google Play च्या सूचीमध्ये दिसला आहे. स्मार्टफोनचा पहिला लूक समोर आला आहे. परंतु अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

फोनमध्ये Exynos 1380 चिपसेट दिली जाऊ शकते. स्मार्टफोन 6GB रॅमने सुसज्ज असेल. हा स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी (Battery) देण्यात येईल. जी २ दिवसांचा पॉवर बॅकअप देईल. याचसोबत बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेन.

फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असेल. हा फोन Android 14 OS वर काम करणार आहे. स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह बाजारात उपलब्ध होईल. हा फोन Galaxy A35 ची रिब्रँडेड आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप पाहायला मिळणार आहे. कॅमेराची मुख्य लेन्स 50MP ची असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

SCROLL FOR NEXT