सध्या लगीनसराईचे दिवस सुरु आहेत. लग्नकार्यात सर्वाधिक खरेदी केली जाते. कपड्यांपासून ते अगदी दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे ग्राहकांचा सोने-चांदी खरेदी करण्याकडे जास्त कल दिसत आहे. सोने चांदीचे दर मागील काही दिवस कमी झाले होते. त्यानंतर आता हे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. सोन्याच्या किंमतीत तब्बल ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. देशात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ७४,०२० रुपये आहे. जाणून घेऊया सोने-चांदीचे नवे दर
सोन्याचे भाव (Gold Rate Today)
आज सोन्याच्या दरात जवळपास ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत १८ कॅरेट सोने ५५,५१० रुपये प्रतितोळा विकले जात आहे. २२ कॅरेट सोने ६७,५८० रुपयांनी प्रतितोळा विकले जात आहे. २४ कॅरेट सोने प्रतितोळा ७४,०२० रुपयांनी विकले जात आहेत.
चांदीचे भाव (Silver Rate Today)
१ किलो चांदीच्या किंमतीत जवळपास १,५०० रुपयांनी वाढ जाली आहे. देशात १ किलो चांदी जवळपास प्रतितोळा ८९,१०० रुपयांनी विकली जात आहे. काल चांदीची किंमत ८७,६०० रुपये होती. या किंमतीत आज वाढ झाली आहे.
देशात सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीला चर सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला होता. मे महिन्याच्या सुरुवातील सोन्याचे भाव ७३ हजार रुपये झाले होते. त्यानंतर आता हे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.