Petrol Diesel Rate (16th May 2024): महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर वधारले की घसरले? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesl Rate: सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आलेली जराही वाढ ही त्यांच्या महिन्याचे बजेट कोलमडते.
Petrol Diesl Rate (16th May 2024
Petrol Diesl RateSaam TV
Published On

सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आलेली जराही वाढ ही त्यांच्या महिन्याचे बजेट कोलमडते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर दिसून आल्या आहेत. मुंबई असो वा पुणे या महत्त्वाच्या शहरातही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत जास्त बदल होताना दिसत नाही.

Petrol Diesl Rate (16th May 2024
Business Idea: फक्त ५० हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

देशभरात दररोज सकाळी ठिक ६ वाजता पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करण्यात येतात. त्याचप्रमाणे आजही अर्थात १६ मे २०२४ रोजीच्या पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झालेले आहेत. पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमतीनुसार मेगा सिटीमध्ये आणि राज्यातील काही शहरातील नवीन दर जाणून घेऊयात.

मेगा सिटीमध्ये आजच्या नवीन जाहीर झालेल्या किंमती

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर आज डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईमध्ये (Mumbai) पेट्रोल १०४.२१ रुपये आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटरने मिळत आहे.

कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटर आहे. तसेच डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे

तर चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर देखील आहेत तसेच आहे. पेट्रोल १००.७६ आणि डिझेल ९२.३५ रुपये प्रति लिटर आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल १०४.२१ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये / प्रति लिटर

पुणे

पेट्रोल १०३.६९ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.२३ रुपये / प्रति लिटर

नाशिक(Nashik)

पेट्रोल 10३.८१ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.३५ रुपये / प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०३.९६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये / प्रति लिटर

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही घरबसल्या देखील जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे तुम्हाला तुमच्या शहरातील दर समजतील. यासाठी तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास RSP सोबत सिटी कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एक एसएमएस पाठवावा लागेल.

बीपीसीएलचे ग्राहक असल्यास तुम्ही RSP लिहून आणि 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या अपडेट तुम्हाला तुमच्या शहरानुसार तुमच्या मोबाईल फोनवर (Mobile) एसएमएसद्वारे मिळतील.

Petrol Diesl Rate (16th May 2024
Business सुरू करण्यासाठी MSME मध्ये नोंदणी करणं आवश्यक आहे का? काय आहेत फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com