Maharashtra Politics: लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार

Maharashtra Assembly Election: सध्या लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापलं असलं, तरी प्रत्येक नेता विधानसभेचं गणित डोळ्यासमोर ठेवून सोयीनं काम करतोय.
लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार
Chhagan Bhujbal, Bharti Pawar, Narhari ZirwalSaam Tv
Published On

lok sabha election 2024:

>> प्रवीण देवळेकर

सध्या लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापलं असलं, तरी प्रत्येक नेता विधानसभेचं गणित डोळ्यासमोर ठेवून सोयीनं काम करतोय. नांदगावमध्ये सुहास कांदे भुजबळांवर बरसतात, दिंडोरीत एकीकडे माकपचे जे. पी. गावित शरद पवार गटाच्या भास्कर भगरें विरोधात बंड थोपटतात, तर दुसरीकडे त्याच भगरेंना अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ मदत करतात. अशी गोंधळाची परिस्थिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दिसतेय. दरम्यान अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी भास्करराव भगरेंचा प्रचार करत असल्याचा आरोप फेटाळलाय.

नांदगाव विधानसभेच्या जागेवरून आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्या जुंपलीय. 2019च्या विधानसभेला सुहास कांदेंनी पंकज भुजबळांचा पराभव केला होता. मात्र यंदा भुजबळ महायुतीसोबत असल्यामुळे उमेदवारीचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सुहास कांदेंनी आधीच आक्रमक पवित्रा घेत भुजबळांना लक्ष्य केलंय.

लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार
Maharashtra Politics: दादांची दमबाजी, सुप्रियाताईंची ढाल; निलेश लंकेसाठी सुळेंनी घेतला अजित पवारांशी पंगा, VIDEO

दिंडोरी लोकसभेच्या मैदानात भाजपच्या उमेदवार भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र ऐनवेळी माकपचे जिवा पांडू गावित यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे ट्विस्ट निर्माण झाला होता. अखेर शरद पवारांनी जे पी गावितांना कळवण विधानसभेच्या उमेदवारीचं आश्वासन देत बंड थोपवल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे नाशिक लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रांमध्येही महायुतीच्या नेत्यांचा सुप्त संघर्ष सुरु आहे. येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ असले तरी भाजपच्या अमृता पवारही इच्छुक आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे आमदार आहेत. मात्र शिदेसेनेचे उपनेते अजय बोरस्तेंनी लोकसभेसाठी माघार घेताना नाशिक मध्यसाठी शब्द घेतल्याची चर्चा आहे. याशिवाय नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी मनसेची दावेदारी असणार आहे. मनसेने लोकसभा निवडणुकीत माघार घेतल्यामुळे विधानसभेची दावेदारी प्रबळ मानली जातेय.

लोकसभेच्या रणधुमाळीत विधानसभेची तयारी? नाशिक, दिंडोरीत सर्वपक्षीयांचा 'सोयीनं' प्रचार
Amit Shah: मोदी ७५ वर्षांचे झाले तरी पंतप्रधान तेच राहती, अरविंद केजरीवालांना अमित शाह यांचे प्रत्युत्तर

एकूणच नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या धामधुमीतच नेत्यांनी विधानसभेची तयारी सुरु केलीय. त्यामुळे सर्वांची मनधरणी करताना महायुती आणि मविआतल्या वरिष्ठांचा कस लागलाय आणि यामुळेच आगामी विधानसभेत जागावाटप करताना सर्वाचीच कसोटी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com