Samsung New LED TVs: Samsung Crystal 4k, Vivid Crystal 4k vision pro, and crystal 4k Vivid Pro tv series launched Know the starting price
Samsung New LED TVs: Samsung Crystal 4k, Vivid Crystal 4k vision pro, and crystal 4k Vivid Pro tv series launched Know the starting price Saam TV
बिझनेस

Samsung New LED: सॅमसंगकडून क्रिस्टल 4 के, व्हिजन प्रो आणि विविड प्रो टीव्ही सिरीज लॉन्च, किमत पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samsung New LED TV Series :

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज ३२,९९० रूपयांपासून सुरू होणारे क्रिस्‍टल ४के विविड, क्रिस्‍टल ४के व्हिजन प्रो आणि क्रिस्‍टल ४के विविड प्रो टीव्‍ही सिरीज लाँच केली, जे उत्‍साहवर्धक कॅशबॅक ऑफर्स आणि जवळपास १८ महिन्‍यांपर्यंत नो कॉस्‍ट ईएमआय अशा सर्वोत्तम ऑफर्ससह उपलब्‍ध आहेत.

२०२४ क्रिस्‍टल ४के टीव्‍ही लाइन-अप ४के अपस्‍केलिंग, सोलारसेल रिमोट, मल्‍टी वॉईस असिस्‍टण्‍ट, क्‍यू-सिम्‍फोनी आणि क्रिस्‍टल प्रोसेसर ४के अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह येते.

नवीन क्रिस्‍टल ४के विविड, क्रिस्‍टल ४के व्हिजन प्रो आणि क्रिस्‍टल ४के विविड प्रो टीव्‍ही सिरीज ४३-इंच, ५०-इंच, ५५-इंच, ६५-इंच आणि ७५-इंच स्क्रिन आकारांमध्‍ये ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍स व Samsung.com वर उपलब्‍ध असेल.

तरूण ग्राहकांची वास्‍तविक पिक्‍चर क्‍वॉलिटी, सर्वोत्तम ऑडिओ अनुभव व उच्‍चस्‍तरीय सुरक्षिता वैशिष्‍ट्ये असलेल्‍या स्‍मार्ट टीव्‍ही (Tv) असण्‍याची इच्‍छा आहे. २०२४ क्रिस्‍टल ४के टीव्‍ही सिरीज उच्‍च दर्जाचा टीव्‍ही पाहण्‍याचा अनुभव देत, तसेच स्‍मार्ट व कनेक्‍टेड राहणीमानाचे तत्त्व वाढवत समकालीन कुटुंबांसाठी बेंचमार्क स्‍थापित करते.

ग्राहकांना क्‍यू-सिम्‍फोनी देखील मिळते, ज्‍यामुळे टीव्‍ही व साऊंडबार एकाचवेळी कार्यरत राहत सर्वोत्तम सराऊंड इफेक्‍ट तयार करतात, ज्‍यासाठी टीव्ही स्‍पीकर्स म्‍यूट करण्‍याची गरज भासत नाही,'' असे सॅमसंग (Samsung) इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.

२०२४ क्रिस्‍टल ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये सॅमसंग टीव्‍ही प्‍लस आणि बिल्‍ट-इन आयओटी हबसह काम ऑनबोर्डिंग यासारखी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये देखील आहे. बिल्‍ट-इन मल्‍टी वॉईस असिस्‍टण्‍ट ग्राहकांना बिक्‍स्‍बी किंवा अॅमेझॉन अॅलेक्‍साचा वापर करत कनेक्‍टेड होम अनुभवाचा आनंद घेण्‍याची सुविधा देते.

२०२४ क्रिस्‍टल ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये ४के अप‍स्‍केलिंग वैशिष्‍ट्य आहे, जे ४के डिस्‍प्‍लेच्‍या उच्‍च रिझॉल्‍यूशनशी जुळणारे कमी रिझॉल्‍यूशन कन्‍टेन्‍टचा दर्जा वाढवते, वास्‍तविक ४के पिक्‍चर क्‍वॉलिटी देते. वन बिलियन ट्रू कलर्स - प्‍युअरकलर, क्रिस्‍टल प्रोसेसर ४के आणि एचडीआर१०+ यासह ग्राहक गडद व प्रखर प्रकाशामध्‍ये सर्वोत्तम कॉन्स्ट्रास्‍टचा आनंद घेऊ शकतात.

सर्वोत्तम कन्‍टेन्‍ट पाहण्‍याच्‍या अनुभवासाठी क्रिस्‍टल ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये ओटीएस लाइट आहे, जे ग्राहकांना स्क्रिनवरील चित्रे वास्‍तविक असल्‍यासारखा अनुभव देते. दोन व्‍हर्च्‍युअल स्‍पीकर्सच्‍या माध्‍यमातून ३डी सराऊंड साऊंडची निर्मिती होते. अॅडप्टिव्‍ह साऊंड रिअल-टाइममध्‍ये कन्‍टेन्‍टचे सीननुसार विश्‍लेषण करत सानुकूल साऊंड अनुभव देते, ज्‍यामधून अधिक डायनॅमिक व सर्वोत्तम इफेक्‍ट्स पाहायला मिळतात.

तसेच, अनेक स्क्रिन डिझाइन परिपूर्ण, सर्वोत्तम व्‍युईंग अनुभव देतात. २०२४ क्रिस्‍टल ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये स्‍मार्ट होम अनुभव देणारे मुख्‍य वैशिष्‍ट्य स्‍मार्ट हब आहे, ज्‍यामधून मनोरंजन व गेमिंगचा अद्वितीय आनंद मिळतो. तसेच या सिरीजमध्‍ये सॅमसंग टीव्‍ही प्‍लस सर्विस देखील आहे, ज्‍यामध्‍ये भारतातील १०० चॅनेल्‍सचा समावेश आहे.

1. ४के अपस्‍केलिंग

४के अपस्‍केलिंग वापरकर्त्‍यांना आवडणारे कन्‍टेन्‍ट पाहण्‍यासाठी जवळपास ४के रिझॉल्यूशन देते. हे वैशिष्‍ट्य टीव्‍ही तंत्रज्ञानामध्‍ये लक्षणीय सुधारणा करते, ज्‍यामुळे प्रेक्षक पाहत असलेल्‍या कन्‍टेन्‍टचे रिझॉल्‍यूशन कोणतेही असो उच्‍च दर्जाचा व्हिज्‍युअल अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. ४के टेलिव्हिजन्‍सचा सर्वाधिक आनंद घेऊ पाहणाऱ्यांसाठी हे मुख्‍य वैशिष्‍ट्य आहे.

2. सोलारसेल रिमोट

सोलारसेल रिमोट घरातील लाइट्सच्‍या माध्‍यमातून देखील चार्ज करता येऊ शकतो, ज्यामुळे डिस्‍पोजेबल बॅटऱ्यांचा वापर करण्‍याची गरज दूर होते.

3. मल्‍टी वॉईस असिस्‍टण्‍ट

नवीन टेलिव्हिजन्‍स बिक्‍स्‍बी किंवा अॅमेझॉन अॅलेक्‍सासह सुलभ कंट्रोल्‍सची खात्री देतात. हे दोन्‍ही वैशिष्‍ट्य कनेक्‍टेड होमसाठी प्रगत कंट्रोल्‍स देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे अधिकाधिक मनोरंजनाचा आनंद घेता येतो.

4. क्रिस्‍टल प्रोसेसर ४के

वापरकर्त्‍यांना शक्तिशाली ४के व्हिजनमधील रंगसंगतींप्रमाणे अनुभव देणारे क्रिस्‍टल प्रोसेसर ४के १६-बीट ३डी कलर मॅपिंग अल्‍गोरिदमसह अचूक रंगसंगती देते. हे अल्‍गोरिदम अॅडप्टिव्‍ह ४के अपस्‍केलिंगच्‍या माध्‍यमातून वास्‍तविक ४के रिझॉल्‍यूशनसाठी पिक्‍चरला सानुकूल करत विविध डेटाचे विश्‍लेषण करते.

5. ओटीएस लाइट

ओटीएस लाइट (ऑब्‍जेक्‍ट ट्रॅकिंग साऊंड लाइट) दोन व्‍हर्च्‍युअल टॉप स्‍पीकर्स देते, ज्‍यामुळे ग्राहकांना प्रत्‍येक सीनमधील भावनांचा अनुभव मिळतो. यामध्‍ये ऑब्‍जेक्‍ट-ट्रॅकिंग साऊंड आहे, जे स्क्रिनवरील घटकांच्‍या हालचालींवर देखरेख ठेवते आणि मल्‍टी-चॅनेल स्‍पीकर्सचा वापर करत कन्‍टेन्‍टनुसार साऊंड निर्माण करते. यामुळे डॉल्‍बी डिजिटल प्‍लसच्‍या माध्‍यमातून डायनॅमिक ३डी-सारखा साऊंड अनुभव मिळतो.

6. क्‍यू-सिम्‍फोनी

हे इंटेलिजण्‍ट वैशिष्‍ट्य सॅमसंग टीव्‍ही व साऊंडबारला सिन्‍क्रोनाइज करत सराऊंड साऊंडची निर्मिती करते, ज्‍यासाठी टेलिव्हिजन स्‍पीकर्स म्‍यूट करण्‍याची गरज भासत नाही. सॅमसंगचे क्‍यू-सिम्‍फोनी वैशिष्‍ट्य सॅमसंग क्रिस्‍टल ४के टीव्‍हींसाठी अद्वितीय आहे, तसेच टीव्‍हीच्‍या बिल्‍ट-इन स्‍पीकर्सना साऊंडबारसोबत सिन्‍क्रोनाइज करते, ज्‍यामुळे त्‍यांचे आऊटपुट्स एकत्र होत विशाल व सुस्‍पष्‍टपणे आवाज ऐकू येतो.

7. गेमिंग वैशिष्‍ट्ये

गेमर्ससाठी नंदनवन असलेल्‍या २०२४ क्रिस्‍टल ४के टीव्‍ही सिरीजमध्‍ये ऑटो गेम मोड आणि मोशन एक्‍सलेटर आहे, ज्‍यामधून अल्टिमेट गेमिंग अनुभवासाठी जलद फ्रेम ट्रान्झिशन व कमी लेटण्‍सीची खात्री मिळते.

8. किंमत

  • क्रिस्‍टल ४के विविड सिरीजची किंमत ३२,९९० रूपयांपासून सुरू होते आणि Samsung.com, Amazon.in व Flipkart.com वर उपलब्‍ध आहे.

  • क्रिस्‍टल ४के व्हिजन प्रो सिरीजची किंमत ३४,४९० रूपयांपासून सुरू होते आणि Samsung.com व Flipkart.com वर उपलब्‍ध आहे.

  • क्रिस्‍टल ४के विविड प्रो सिरीजची किंमत ३५,९९० रूपयांपासून सुरू होते आणि Samsung.com व Amazon.in वर उपलब्‍ध आहे.

  • २०२४ क्रिस्‍टल ४के टीव्‍ही सिरीज जवळपास २ वर्षांच्‍या वॉरंटीसह* येते. (१ वर्ष प्रमाणित + फक्‍त पॅनेलवर १ वर्ष एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SRH Qualify For Playoffs: हैदराबादची झाली 'चांदी'; एकही चेंडू न खेळता मिळालं प्लेऑफचं तिकीट

Maharashtra Politics 2024 : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर; शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा

SCROLL FOR NEXT