Government Job Opportunity Saam Tv
बिझनेस

Government Job Opportunity: सरकार नोकरीची सुवर्णसंधी; 2.5 लाख मिळेल पगार, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख

Sail Recruitment Job: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ओडिशा ग्रुप ऑफ मॉइन्सने विविध रूग्णालयात भरती सुरू केली आहे.

Manasvi Choudhary

डॉक्टर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. यातच अनेक जण डॉक्टर झाल्यानंतर एक तर रुग्णसेवा म्हणून नोकरी करतात किंवा स्वतःचा दवाखाना सुरु करतात. अशातच सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

ओडिशा ग्रुप ऑफ मॉइन्सने विविध रूग्णालयात भरती सुरू केली आहे. GDMO, स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट या पदांसाठी ही भरती आहे. या भरती अंतर्गत रूग्णालयात ११ पदांवर निवड करण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, ज्या उमेदवारांकडे वैद्यकीय क्षेत्राची पदवी आहे.ते उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

किती आहेत पदे?

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या भरतीअंतर्गत एकूण ११ पदांवर भरती केली जाणार आहे.

काय आहे पात्रता?

GDMO, स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षांपर्यंत असावे.

काय आहेत शेवटची मुदत?

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी २४ सप्टेंबरपर्यत अर्ज करायचे आहेत.

किती मिळणार पगार?

या तीन पदासांठी निवड झाल्यानंतर तुम्हाला 2,50,000 मासिक वेतन मिळेल.

अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे. उमेदवारांना ऑफलाईन मुलाखतीसाठी कोणताही भत्ता दिला जाणार नाही.मुलाखतीची वेळ सकाळी 9.30 ls 11.00 पर्यंत आहे. मुलाखतीचे ठिकाण कॉन्फरस हॉल, इस्पात जनरल हॉस्पिटल, सेक्टर- १९, राउरकेला -769005. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ sailcareers.com ला भेट द्यायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT