Sukanya Samruddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल; १५ दिवसांत करा हे काम; अन्यथा...

Sukanya Samruddhi Yojana New Rule: आपल्या मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत.
Sukanya Samruddhi Yojana
Sukanya Samruddhi YojanaSaam Tv
Published On

प्रत्येकजण आपल्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सरक्षित व्हावे यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवली आहेत.या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यावर मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते. या योजनेबाबत नवीन नियम लागू होणार आहेत. या योजनेअंतर्गत मुली लहान असल्यापासून गुंतवणूक करायची असते. मुलींचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर त्यांना हे पैसे मिळतात.

Sukanya Samruddhi Yojana
Post Office Scheme: फायदाच फायदा, पोस्ट ऑफिसच्या १० जबरदस्त योजना! तुम्ही कुठे गुंतवणूक केली?

सुकन्या समृद्धी योजनेबाबत नवीन नियम लागू होणार आहे. १ ऑक्टोबरपासून हे नवीन नियम लागू करण्यात येणार आहे.सुकन्या योजनेतीतील राष्ट्रीय योजनेअंतर्गत मार्गदर्शक तत्वे जारी करण्याती आली आहे. या योजनेअंतर्गत एखाद्या मुलीचे खाते जर तिच्या आजी आजोबांनी उघडले असेल तर ते अपडेट करणे गरजेचे आहे.

सुकन्या समृद्धीचे खाते पालकांच्या नावावर ट्रान्सफर करावे लागेल

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या नावावरील खाते गे त्यांच्या पालकांनीच उघडलेले असावे. अनेकदा मुलींच्या आजी आजोबांनी हे खाते उघडलेले असतात. परंतु आता हे खाते तुम्हाला ट्रान्सफर करावे लागेल. योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, केवळ पालक आणि कायदेशीर पालक खाते उघडू शकतात.

Sukanya Samruddhi Yojana
Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळणार इतके पैसे; नोव्हेंबरपर्यंत करु शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

आवश्यक कागदपत्रे

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आजी आजोबांनी उघडलेले खाते पालकांच्या नावावर ट्रान्सफर करावे लागेल. पासबुक, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, कायदेशीर पालक असल्याचा दाखला, ओळख प्रमाणपत्र, जुन्या खातेधारकांचे प्रमाणपत्र आणि नवीन खातेधारकांचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

Sukanya Samruddhi Yojana
Unified Pension Scheme: शिंदे सरकारचा मोठा निर्णय , केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळणार, महाराष्ट्र पहिलेच राज्य!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com