प्रियांका चोप्राचा फिटनेस फंडा, 'देसी डाएट'मध्ये रोज काय खाते? वाचा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रियांका चोप्राचा नादच नाही!

बॉलिवूड आणि आता हॉलिवूडही गाजवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमी तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकने फॅन्सचं लक्ष वेधून घेत असते. तिच्या अभिनयाला तर तोडच नाही. म्हणूनच बॉलिवूड ते हॉलिवूड अशी झेप तिनं घेतलीय.

Priyanka Chopra Photos | saam tv

डाएट प्लान

प्रियांका तिच्या आउटफिटमुळं नेहमीच चर्चेत असते. आता तिने डाएटबद्दल महत्वाच्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

outfit | saam tv

वर्कआउट

प्रियांका चोप्राला फिटनेसच्या बाबतीत खूप परफेक्ट राहायला आवडतं. त्यात रोजच्या वर्कआउटसोबत ती डाएटकडे विशेष लक्ष देते.

work out | saam tv

प्रियांकाचं मॉर्निंग रूटीन

प्रियांका रोज सकाळी काही कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस टाकून पिते. त्यामुळे शरीराला पोषण मिळते.

morning routine | saam tv

सकाळचा नाश्ता

प्रियांका तिच्या सकाळच्या नाश्त्यात अंडी, टोस्ट आणि फळ खाणं पसंत करते. कधीकधी ती इडली - डोसाही खाते.

Breakfast Recipes | SAAM TV

आहार

नाश्त्यानंतर काही तासांतच ती जेवण करते. जेवणाच्या थाळीत तिला नाचणीची भाकरी नेहमीच लागते. शाकाहारी जेवण सध्या ती पसंत करते.

dinner | saam tv

जेवणातले पदार्थ

प्रियांका घरगुती आहार घेते. त्यात भेंडी, तूरडाळ, मिक्स भाज्या, दही आणि लोणचं या पदार्थांचा समावेश होतो.

Dinner Diet | Canva

रात्रीचं जेवण

प्रियांका चोप्रा सध्या नॉनव्हेज खात नाही. ती तिच्या आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करते. त्यात रात्रीच्या जेवणात ती बऱ्याच वेळेस सूप पिणं पसंत करते.

dinner | canva

हलके पदार्थ

प्रियांका रात्री शक्यतो जेवत नाही. ती ड्रायफ्रुट्स आणि दूध घेते. त्याने अपचनाचा कोणताच त्रास होत नाही.

light meals | canva

व्हायरल

टीप : हा व्हिडीओ माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

priyanka | canva

NEXT:

Astrology number | saam tv
येथे क्लिक करा: प्रेमसंबंध, वैवाहिक आयुष्य सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?