Rules Change In 1st January 2024 Saam Tv
बिझनेस

Rules Change In 1st January 2024 : नवे वर्ष, नवे नियम! LPG पासून ते बँकेच्या नियमापर्यंत होणार मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री

कोमल दामुद्रे

Financial Rules :

लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. येत्या नवीन वर्षात काही नियम बदलणार आहे. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अनेक मोठे नियम बदलण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो.

१ जानेवारी २०२४ पासून बँक (Bank), सिम कार्ड, विमा याक्षेत्रांमध्ये बदल होणार आहेत. एलपीजीच्या किमती, पेट्रोल-डिझेल आणि अनेक उत्पादनांच्या किमती (Price) कमी जास्त होण्याची शक्यता आहे. १ जानेवारीपासून बदलणाऱ्या या नियमांबद्दल जाणून घेऊया.

1. सिमकार्ड

मोबाईल (Mobile) सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमानुसार टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची सहमती घ्यावी लागणार आहे. तसेच सरकारने यासाठी टेलिकॉम कंपन्यांना डिजिटल केवायसी करणे अनिवार्य केले आहे. यासाठी तुम्हाला नवी सिम खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.

2. LPG च्या किमती बदलण्याची शक्यता

प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजी आणि इंधनाचे नवे दर जाहिर केले जातात. LPG आणि CNG, PNG च्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

3. आयकर रिटर्न

२०२२-२३ च्या आर्थिक वर्षात ज्या करदात्यांनी ITR भरला नाही त्यांना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कर भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. १ जानेवारीपासून यावर कारवाई केली जाऊ शकते.

4. बँकेचे नियम

जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून बँक लॉकरच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. RBI ने बँकेच्या लॉकरमध्ये बदल करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतचा कालावधी दिला होता. या नवीन प्रक्रियेत लॉकर वापरकर्त्यांना बँक लॉकरवर सही करावी लागणार आहे.

5. डिमॅट अकाउंट

सेबीने डिमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याची शेवटची तारीख ही ३१ डिसेंबर २०२३ दिली आहे. ज्या खातेधारकांनी नॉमिनी जोडली नसतील. त्यांचे अकाउंट १ जानेवारीपासून बंद होऊ शकतात.

6. विमा प्रीमियम महागणार

२०२४ च्या नव्या वर्षात विमा प्रीमियम महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रीमियम कसा भरला जाऊ शकतो याचे नियोजन करा.

7. विमान प्रवास महागणार

येत्या नवीन वर्षात प्रवास महागण्याची शक्यता आहे. एअरलाइन तिकीटावरील कर २० टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

8. सॉफ्ट ड्रिंक्स महागणार

नवीन वर्षात थंड पदार्थ, फळांचा ज्यूस, प्लांट बेस्ड दुधावर कर आकारला जाऊ शकतो. त्यामुळे ही उत्पादने महाग होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT