Rule Change Saam Tv
बिझनेस

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Rule Change From 1st October 2025: आजपासून पैशांसंबधित अनेक नियमांत बदल होणार आहे. यामध्ये यूपीआय सर्व्हिस, एलपीजी गॅसचे नियम बदलणार आहे.

Siddhi Hande

आजपासून अनेक नियमांत बदल

रेपो रेटपासून ते एलपीजी गॅसच्या किंमती बदलणार

कोणते १५ नियमांत बदलणार?

आजपासून ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल झाले आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमतींपासून ते पेन्शच्या नियमांचा समावेश आहे. दरम्यान, आजपासून कोणते १५ नियम बदलणार आहेत त्याबाबत माहिती घेऊया.

१. सिलेंडरच्या किंमती बदलल्या

आजपासून सिलेंडरच्या किंमतीत बदल झाले आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमती महागल्या आहेत. १९ किलोग्रॅम किंमतीचे सिलेंडर १५ रुपयांनी महागले आहेत. दरम्यान, घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेले नाहीत.

२. रेल्वे तिकीटाच्या नियमात बदल

आता रेल्वे तिकीट बुकिंग करतानाच्या नियमात बदल झालेले आहे. यामध्ये आरक्षण खुलं झाल्यानंतर तुम्हाला १५ मिनिटांत तिकीट बुकिंग होणार आहे. यामध्ये आधार व्हेरिफिकेशन असणाऱ्या प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे.

३. UPI रिक्वेस्ट बंद

आत यूपीआय अॅपवर रिक्वेस्ट सिस्टीम बंद झाली आहे. आता तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून थेट पैसे मागू शकणार नाही.

४. यूपीआयवरुन ५ लाख रुपये पाठवू शकणार

आता यूपीआयवरुन पैसे पाठवण्याची लिमिट वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही ५ लाख रुपये पाठवू शकणार आहे. याआधी लिमिट फक्त १ लाख रुपये होती.

५. UPI ऑटो- पे सर्व्हिस

आता तुम्हाला रिचार्ज, वीजबिल किंवा ओटीटी सबस्क्रिप्शनसाठी ऑटो पे सर्व्हिस मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला पैसे कट झाल्यावर नोटिफिकेशन येणार आहे.

७. NPS मध्ये कमाल योगदान मर्यादा वाढवली

नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये आता तुम्ही एका महिन्याला कमीत कमी १००० रुपये जमा करु शकतात. याआधी ही रक्कम ५०० रुपये होती.

८. NPS ची नवीन टियर सिस्टीम

आता एनपीएसमध्ये दोन सिस्टीम मिळणार आहे.

Tier-1 : रिटायरमेंट आणि टॅक्स बेनिफिट मिळणार आहे

Tier-2 : जी गुंतवणूक करायची ते तुम्ही निवडू शकतात परंतु यामध्ये टॅक्स सूट मिळणार नाही.

९. एनपीएसमध्ये १०० टक्के इक्विटी

आता तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक करत असाल तर सर्व रक्कम ही शेअर मार्केट (इक्विटी) मध्ये लावू शकतात. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न मिळणार आहे. परंतु जोखीमदेखील वाढणार आहे.

१०. मल्टीप स्कीम फ्रेमवर्क

आता एकाच PRAN नंबरवरुन तुम्ही वेगवेगळे CRA स्कीम सुरु करु शकतात. यामध्ये गुंतवणूकदारांना जास्त फायदा मिळणार आहे.

११. ऑनलाइन गेमिंगसाठी नियम

आता सर्व ऑनलाइन गेमिंग कंपन्याना सरकारकडून लायसन्स घेणे गरजेचे आहे.याचसोबत गेमिंगचा भाग होण्यासाठी १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.

१२. रिझर्व्ह बँकेची बैठक

आरबीआयची आज पतधोरण बैठक सुरु आहे. आज रेपो रेटबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

१३. बचत योजनांवरील व्याजदरे

आता बचत योजनांवरील नवीन व्याजदर लागू केले आहे. सरकारने मागील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

१४. ऑक्टोबरमध्ये सुट्ट्या

ऑक्टोबरमध्ये २१ दिवस बँका बंद असणार आहे. त्यामुळे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी पाहून जा.

१५. स्पीड पोस्टमध्ये बदल

आजपासून पोस्ट ऑफिसच्या अनेक नियमांत बदल करण्यात आले आहे. यामध्ये ओटीपी आधारित डिलिवरी, ऑनलाइन बुकिंग, रियल टाइम ट्रॅकिंग अशी सर्व्हिस मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

SCROLL FOR NEXT