Rule Change  Saam tv
बिझनेस

Rule Change : गॅस सिलिंडर ते आधारकार्ड; सप्टेंबर महिन्यात होणार ६ मोठे बदल, खिशावर काय परिणाम होणार?

Rule Change from september : सप्टेंबर महिन्यात होणार ६ मोठे बदल होणार आहेत. गॅस सिलिंडर ते आधारकार्डपर्यंत बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : ऑगस्ट महिना संपायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सप्टेंबर महिन्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या नव्या बदलाचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामध्ये गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्डच्या नियमाचा समावेश आहे. तसेच केंद्र सरकार हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याविषयी घोषणा करु शकतात. जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्यात काय-काय बदल होणार आहेत.

सिलिंडरच्या किंमती

महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल होतात. त्यामुळे कर्मशियल गॅस ते घरगुती गॅसच्या किंमतीत बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील महिन्यात कर्मशियल गॅस दरात ८.५० रुपयांनी वाढ झाली होती. तर जुलै महिन्यात ३० रुपयांनी दर कमी झाले होते.

एटीएफ आणि सीएनजी-पीएनजीचे दर

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीसह एयर टर्बाइन फ्यूल आणि सीएनजी पीएनजीच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेला बदल पाहायला मिळू शकतात.

स्पॅम कॉलपासून होणार सुटका

सप्टेंबर महिन्यात स्पॅम कॉल आणि मेसेजपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. ट्रायने टेलीकॉम कंपन्यांना स्पॅम कॉल आणि मेसेजवर लगाम लावण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ट्रायने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत. बीएसएनले म्हटलं की, ३० सप्टेंबरपर्यंत १४० मोबाइल नंबरने सुरु होणाऱ्या सीरीजचे टेलीमार्केटिंग कॉल आणि कर्मशियल मेसेजला डिस्ट्रीब्यटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटॉफर्मवर शिफ्ट करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपर्यंत या स्पॅम कॉलवर बंदी घालण्यात येऊ शकते.

क्रेडीट कार्डच्या नियमात बदल

१ सप्टेंबरपासून एचडीएफसी बँकच्या यूटिलिटी ट्रांजेक्शनवर रिवॉर्ड प्वाईंटची मर्यादा निश्चित करण्यात येऊ शकते. कस्टमर्स इन ट्रांजेक्शन अंतर्गत दर महिन्याला २०० पॉइंट्स मिळू शकतात. थर्ड पार्टी अॅप ते एज्युकेशन पेमेंटवर एचडीएफसी बँक कोणताही रिवॉर्ड देणार नाही. सप्टेंबर २०२४ पासून आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवर देय असलेली रक्कम कमी होण्याची शक्यता आहे.

महागाई भत्ता

सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकार हे सरकारी कर्मचाऱ्यांचा भत्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता ५० टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. त्यामुळे आता हा महागाई भत्ता ५३ टक्के होण्याची शक्यता आहे.

मोफत आधार कार्ड अपडेट

मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख १४ सप्टेंबर असणार आहे. यानंतर आधारकार्ड संबंधित काही बाबी मोफत होणार नाहीत. १४ सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागेल. मोफत आधार अपडेट करण्याची तारीख १४ जून २०२४ होती. त्यानंतर वाढवून १४ सप्टेंबर २०२४ करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT