बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मुख्य अनुपालन अधिकार (Chief Compliance Office (CCO))पदासाठी भरती करण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या हेड ऑफिसमध्ये ही भरती करण्यात येणार आहे.
ही भरती कंत्राटी पदासाठी करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड केलेल्या उमेदवाराला वेगवेगळ्या प्रोजेक्टसवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवाराची निवड मुलाखत आणि Group Discussion द्वारे केली जाणार आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएन पूर्ण झालेले असावे. त्याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. CA/ICWA/CS/CFA/MBA/LLB पदवीप्राप्त उमेदवारांना पहिली संधी देण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. ३१ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याबाबतची सर्व माहिती बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने वेबसाइटवर दिलेल्या अर्जाप्रमामेच भरुन द्यायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज पुणे, शिवाजीनगरच्या मुख्य कार्यलयात पाठवायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.