Rules Changes From 1st July 2024 Saam Tv
बिझनेस

Rule Changes from July 2024: जुलै महिन्यात होणार अनेक मोठे बदल, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

Priya More

जून महिना संपून जुलै महिना सुरू होण्यासाठी अवघे २ दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक महिन्याला आर्थिक नियमांमध्ये अनेक बदल (Rule Changes from July 2024) होत असतात. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. ई-वॉलेटपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत आणि इनकम टॅक्स रिटर्न भरण्यापर्यंत प्रत्येक महिन्यात बदल होतात. अशामध्ये जुलै महिन्यामध्ये आर्थिक नियमांमध्ये नेमके काय बदल होणार आहोत ते आपण जाणून घेणार आहोत....

पेटीएम वॉलेट -

One97 कम्युनिकेशन्सची पेटीएम पेमेंट्स बँक वॉलेट २० जुलै २०२४ पासून इनअ‍ॅक्टिव म्हणजेच बंद होण्याची शक्यता आहे. शून्य बॅलेन्स असलेल्या वॉलेट आणि एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणतेही व्यवहार न केलेले वॉलेट बंद होऊ शकतात.

इन्कम टॅक्स रिटर्न -

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. या अंतिम मुदतीपूर्वी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरा त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. ३१ जुलै २०२४ नंतर आणि ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी दाखल केलेल्या ITR वर ५ हजार रुपये दंड आकारला जाईल. ३१ डिसेंबर २०२४ नंतर हा दंड वाढून १० हजार रुपये रुपये होईल. ITR उशीरा भरल्यास दरमहा १ टक्का व्याज आकारला जातो.

क्रेडिट कार्ड -

१ जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. एसबीआय क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. १ जुलैपासून सरकारी पेमेंटशी संबंधित व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट बंद केले जातील.

ICICI बँक क्रेडिट कार्ड -

ICICI बँकेने क्रेडिट कार्डमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. क्रेडिट कार्ड जारीकर्त्याने १ जुलै २०२४ पासून कार्ड बदलण्याचे शुल्क १०० रुपयांवरून २०० रुपये केले आहे. शुल्कातील हा बदल Emerald Private Metal Credit ला लागू होणार नाही.

सिटी बँक क्रेडिट कार्ड -

Axis Bank जी भारतातील Citibank क्रेडिट कार्ड आणि ब्रँड नावाचा लायसन्स प्राप्त वापरकर्ता आहे. Axis Bankने घोषणा केली होती की, Citibank ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या ब्रँडमध्ये ट्रान्सफर करणार आहे. हे क्रेडिट कार्डसोबत सेव्हिंग बँक अकाऊंट्सला लागू होईल. अधिसूचनेनुसार, हे ट्रान्सफर १५ जुलै २०२४ पर्यंत पूर्ण केले जाईल.

पीएनबी रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड -

PNB ने RuPay प्लॅटिनम डेबिट कार्ड प्रकारांसह लाउंज प्रवेशासाठी नियम सुधारित केले आहेत. सुधारित नियम १ जुलै २०२४ पासून लागू होतील. PNB प्रति तिमाहीत १ देशांतर्गत एअरपोर्ट लाउंज एक्सेस/रेलवे लाउंज एक्सेस प्रदान करेल. ET अहवालानुसार, ते वार्षिक आधारावर २ आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लाउंजमध्ये प्रवेश प्रदान करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

SCROLL FOR NEXT