Royal Enfield Shotgun 650 Saam Tv
बिझनेस

रॉयल एन्फिल्डची पॉवरफुल बाइक Shotgun 650 लाँच; लूक आणि फीचर्स एकदम 'रॉयल', किंमत जाणून घ्या

Royal Enfield Shotgun 650: रॉयल एन्फिल्ड कंपनी साहसी बाईकसाठी ओळखली जाते. कंपनी नेहमीच नवनवीन बाईक लाँच करत असतात. कंपनीने नुकतीच रॉयल एन्फिल्ड Shotgun 650 विक्रसाठी लाँच केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Royal Enfield Shotgun 650 Price and Features:

रॉयल एन्फिल्ड कंपनी साहसी बाईकसाठी ओळखली जाते. कंपनी नेहमीच नवनवीन बाईक लाँच करत असतात. कंपनीने नुकतीच रॉयल एन्फिल्ड Shotgun 650 विक्रसाठी लाँच केली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Shotgun 650 चे Motorverse Edition सादर केले होते. जे फक्त लिमिटेड एडिशन होते. त्यानंतर कंपनीने आता रेग्युलर व्हर्जन लाँच केले आहे. (Latest News)

किंमत

रॉयल एन्फिलडच्या या नवीन बाईकची किंमत ३.५९ लाख ते ३.७३ लाख रुपये आहे. कंपनीची ही नवीन बाईक अनेक आधुनिक फिचर्स आणि आकर्षक लूकसह लाँच केली आहे.

कंपनीची ही नवीन बाईक 660cc प्लॅटफॉर्मवर तयार केलेली चौथी बाईक आहे. ही नवीन शॉटगन बाइक पोर्टफोलिओमध्ये Interceptor 650, Continental GT 650 आणि Super Meteor 650 लाईन-अपमध्ये समाविष्ट झाली आहे. 650cc सेगमेंटमध्ये कंपनीचे चौथे मॉडेल लाँच झाले आहे.

ही नवीन बाईक २०२१ मध्ये EICMA मोटर शोमध्ये SG65 नावाने सादर केली होती. त्यानंतर या बाईकमध्ये अनके नवीन बदल करण्यात आले आहे. या बाईकची फ्रेम, लूक आणि डिझाइन इतर बाईकप्रमाणेच आहेत.

डिझाइन

नवीन Shotgun 650 मध्ये हेडलँप काउल, नवीन फ्लूयल टँक देण्यात आला आहे. पीशूटर स्टाइल ड्युअल एग्जॉस्ट, स्पेशल टायर आणि हँडलबार, इंजन कोसिंगसाठी ग्लॉसी फिनिश, बार अँड मिरर आणि रिमूवेबल पिलन सीट दिले आहे.

इंजिन

Shotgun 650 मध्ये पॅरलल-ट्विन 648cc इंजिन देण्यात आले आहेत. हे इंजिन 47hpची पॉवर आणि 52.3Nm टॉर्क जनरेट करते. यात समोर 320mm डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात 30mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

SCROLL FOR NEXT