Pulses Price Hike: डाळींच्या किंमतीत वाढ; तूर डाळीच्या किंमतीमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ

Inflation : डिसेंबर २०२३ मध्ये डाळींचा महागाई दर २०.७३ टक्के होता. पण त्याच्या एक वर्षाआधी म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये हा दर ३.१५ टक्के होता. याचा स्पष्ट अर्थ असा की, केवळ एका वर्षाच्या कालावधीत डाळींच्या किरकोळ महागाई दरात १७.५८ टक्के वाढ झाली आहे.
Inflation
Inflation Saam Tv
Published On

Pulses Price Hike Pulses :

महागाईवर कमी करण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रयत्न करत आहे. परंतु सर्व प्रयत्न करूनही मोदी सरकारला महागाई कमी करण्यात यश येत नाहीये. याचदरम्यान किरकोळ महागाई दराचा आकडेवारी जाहीर करण्यात आलीय. या आकडेवारीनुसार डिसेंबर २०२३ मध्ये डाळ आणि त्यांचे काही इतर उत्पादनांच्या महागाईत २०.७३ टक्क्यांची वाढ झालीय. (Latest News)

डिसेंबर २०२३ मध्ये डाळींचा महागाई दर (Inflation Rate) २०.७३ टक्के राहिलाय. तर एका मागील वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये हा दर ३.१५ टक्के होता. या आकड्यातून आपल्याला स्पष्ट होतं की, एका वर्षाच्या काळात किरकोळ महागाईच्या दरात १७.५८ टक्क्यांनी वाढ झालीय. यामुळे सामन्य लोकांचा बजेट बिघडलाय. वाणिज्य मंत्रालयद्वारे (Ministry of Commerce) १५ जानेवारी २०२४ ला डिसेंबर २०२३ च्या घाऊक महागाई दराचे आकडे जाहीर करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यात वाढ झालीय. घाऊक महागाईच्या दरात केवळ डाळींच्या महागाईत १९.६० टक्क्यांची वाढ झालीय. किरकोळ महागाई असेल किंवा घाऊक महागाईमध्ये डाळींच्या महागाईत एका वर्षात मोठी वाढ झालीय. सर्व डाळींपैकी तूर डाळीला जास्त मागणी आहे. याबाबतचा अहवाल ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे.

त्यानुसार १४ जानेवारी २०२४ रोजी किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत १५१.८८ रुपये प्रति किलो होती. वर्षभरापूर्वी तूर डाळीच्या किंमत प्रति किलो ११०.८३ रुपये होती. अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत तूर डाळीच्या किमतीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Inflation
Agriculture News: चिंताजनक! हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम; अन्न उत्पादनात घट होण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com