Agriculture News: चिंताजनक! हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम; अन्न उत्पादनात घट होण्याची शक्यता

Climate change : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे एकूण पेरणी क्षेत्रात ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट झालीय. जमिनीत ओलाव्याची कमतरता निर्माण झाली असून जलाशयांमधील पाणीसाठा कमी झालाय. गहू आणि डाळींच्या उत्पनात घट झालीय.
 Agriculture
AgricultureSaam Tv
Published On

Climate Change Impact on Agriculture:

शाश्वत शेतीसमोर हवामान बदलाचं आव्हान उभे राहत आहे. या वर्षीच्या अनियमित मान्सूनमुळे भारताच्या कृषी उत्पादनावर परिणाम झाला असून अन्नधान्य महागाईत वाढ झालीय. महागाईमुळे सरकारला निर्यातीवर बंदी घालण्यासारखे उपाय करावे लागत आहेत. खराब हवामानामुळे खरीप उत्पादनात घट झाल्यामुळे जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाच्या कृषी क्षेत्राचा विकास दर केवळ १.२ टक्के राहिलाय. (Latest News)

याचा चालू रब्बी हंगामावर (Rabi season) विपरित परिणाम झालाय. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे एकूण पेरणी (sowing) क्षेत्रात ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट झालीय. जमिनीत ओलाव्याची कमतरता निर्माण झाली असून जलाशयांमधील पाणीसाठा कमी झालाय. गहू (wheat) आणि डाळींच्या उत्पनात घट झालीय. गव्हाच्या उत्पन्नात ३ टक्के तर डाळींच्या उत्पन्नात ८ टक्के घट झाल्याने अन्न उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने चिंता वाढलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवामान बदलाची (Climate change) समस्या दूर करण्यासाठी गतिशील प्रतिसाद धोरणे विकसित करण्यासाठी धोरण निर्माते आणि वैज्ञानिक समुदायांची चिंता वाढलीय. कारण काही राज्यांमधील मोठं क्षेत्र अजूनही पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर (agriculture) अवलंबून आहेत.

 Agriculture
Agriculture News: शेडनेट हाऊसमधील भाजीपाल्याची शेती देईल भरघोस नफा; सरकार देते ५०टक्क्यांची सबसिडी

रब्बी पिकांचे क्षेत्र ६४८ लाख हेक्टरपर्यंत

रब्बी क्षेत्रामध्ये सध्या घट झाली असली आहे,पण कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, पुढील काही आठवड्यांत ही तफावत कमी होऊ शकते. रब्बी पिकांचे एकूण पेरणी क्षेत्र गेल्या पाच वर्षांच्या (६४८ लाख हेक्टर) सरासरी पातळीपर्यंत पोहोचू शकते. तर कडधान्याखालील क्षेत्र कमी होणार आहे. यामागे भातासारख्या खरीप पिकांची उशिरा कापणी (harvest) आणि पीक विविधीकरणाचा कलमुळे कडधान्याचे क्षेत्र कमी झाले असल्याचं अधिकारी सांगतात. दरम्यान २०२२ च्या तुलनेत यावर्षी मोहरी आणि रेपसीडसह तेलबियांचे क्षेत्र १ लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे, यामुळे खाद्यतेलाचे आयातवरील खर्च कमी होण्यास मदत होईल.

 Agriculture
Agriculture News: शेतकऱ्यांनो! तुमच्या शेतातील भाजीपाला पोहोचणार परदेशात; काय आहे बळीराजाचं उत्पन्न वाढवणारा सरकारचा प्लान

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणण्यानुसार तेलबियांवर भर दिल्याने आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी धोरणात्मक उपाय फायदेशीर ठरलेत. पण मात्र हवामानाशी संबंधित अडथळ्यांमुळे आव्हाने कायम आहेत. कृषी मंत्रालयाचा सकारात्मक दृष्टीकोन कृषी क्षेत्राच्या लवचिकतेवर आधारित आहे. येत्या हंगामात अन्नधान्याचे उत्पादन अधिक मिळवण्यासाठी पीक विविधतेत समतोल राखणे आणि आर्द्रतेच्या कमतरतेवर मात करणे महत्वाचं ठरणार आहे.

२०१४ पासून हवामानास अनुकूल पिकांचे १,८८८ प्रकारचे बियाणे विकसित करण्यात आली आहेत.अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली होती. दरम्यान भारताच्या कृषी निर्यातीत $४-५ अब्ज डॉलरची घट होण्याची शक्यता आहे. तर देशांतर्गत वाढती महागाई आणि वाढत्या किमती कमी करण्यासाठी भारताला निर्यातीवर निर्बंध घालणे भाग पडले आहे. भारत गहू, तांदूळ आणि साखरेचं उत्पादन करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे

 Agriculture
Agriculture News: व्वा हे भारीय! विश्वभारतीने शोधलाय नवा बॅक्टेरिआ; पिकांच्या वाढीसाठी करणार मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com