नवीन वर्षात सोन्याचा भावात सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. पौष महिना सुरु झाला की, शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. या काळात लग्न केले जात नाही.
अशातच आज सोन्याचा भाव गडगडला आहे. काल मकर संक्रातीच्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली होती. मागील वर्षात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती.
आज सोन्याच्या किमतीत जागितक पातळीवर वाढ होताना दिसत आहे. कॉमेक्सवर सोन्याची (Gold) जागतिक फ्युचर्स किंमत (Price) 0.30 टक्के किंवा $6.10 च्या वाढीसह $2057.70 प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली. तर सोन्याच्या जागतिक स्पॉट किमतीतही वाढ झाली आहे. प्रति औंस $ 2054.11 वर व्यापार करत आहे. जाणून घेऊया आजचे दर
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८२० रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,४८० रुपये मोजावे लागतील. २४ कॅरेटसाठी ११० रुपये जास्तीचे मोजावे लागतील.
आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत प्रति किलोत ३०० रुपयांनी घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)
मुंबई- ६३,३३० रुपये
पुणे - ६३,३३० रुपये
नागपूर - ६३,३३० रुपये
नाशिक - ६३,३७० रुपये
ठाणे - ६३,३३० रुपये
अमरावती - ६३,३३० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.