Shruti Vilas Kadam
मटकी, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ आणि तेल हे साहित्य तयार ठेवा.
रात्रभर भिजवलेली मटकी कुकरमध्ये शिजवून घ्या, मटकी मऊ झाली पाहिजे.
कढईत तेल गरम करून त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट परतून घ्या, नंतर मसाले घालून चांगले परतावे.
शिजवलेली मटकी फोडणीत घालून पाणी टाकून उसळीला उकळी आणा.
तिखट मिसळ मसाला किंवा गोडा मसाला घालून रस्सा चवीनुसार झणझणीत करा.
पातेल्यात उसळ, त्यावर रस्सा, फरसाण, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर घालून मिसळ सजवा.
मिसळ पाव, ब्रेड किंवा चपातीसोबत गरमागरम मिसळ खूपच चविष्ट लागते.