Royal Enfield Hunter 350: रॉयल एनफील्ड हंटर 350 या दोन नवीन जबरदस्त रंग पर्यायांमध्ये झाली सादर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield News: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield ने हंटर 350 रोडस्टर रेंजमध्ये दोन नवीन रंग पर्याय समाविष्ट केले आहेत. लोकांना ही बाईक खूप आवडली असल्याचं पाहायला मिळत आहे.
Royal Enfied Hunter 350 Gets Two New Colours
Royal Enfied Hunter 350 Gets Two New ColoursSaam Tv
Published On

Royal Enfield Hunter 350 New Color Options:

प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield ने हंटर 350 रोडस्टर रेंजमध्ये दोन नवीन रंग पर्याय समाविष्ट केले आहेत. लोकांना ही बाईक खूप आवडली असल्याचं पाहायला मिळत आहे. हे दोन नवीन रंग; डॅपर ओ आणि डॅपर जी आहेत, ज्यामध्ये ओ आणि जी अक्षरे अनुक्रमे नारिंगी आणि हिरव्या रंगात दर्शवण्यात आली आहेत. नवीन Royal Enfield Hunter 350 Dapper O आणि Dapper Green ची एक्स-शोरूम किंमत 1.70 लाख रुपये आहे.

नवीन रंग पर्याय रॉयल एनफील्ड हंटर 350 पोर्टफोलिओमध्ये डॅपर व्हाइट आणि डॅपर ग्रे रंगांसह सामील झाले आहेत. इतर रंग पर्यायांमध्ये फॅक्टरी ब्लॅक, रिबेल ब्लॅक, रिबेल ब्लू आणि रिबेल रेड यांचा समावेश आहे. डॅपर ओ मध्ये, रॉयल एनफील्ड हंटर 350 डार्क ऑरेंज रंगात आहे. तर रॉयल एनफील्ड लोगो आणि पट्टे अतिशय हलक्या ऑरेंज रंगात दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Royal Enfied Hunter 350 Gets Two New Colours
Amazon Flipkart Offers: 50MP कॅमेरा, 5000 mAh ची दमदार बॅटरी; 7000 पेक्षा कमी किंमतीत Redmi चा हा फोन खरेदी करण्याची संधी

नवीन J प्लॅटफॉर्मवर आधारित, नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये 349cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक एअर-ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आली आहे. जे इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे तेच इंजिन आहे जे Meteor 350 आणि नवीन Classic 350 साठी देखील वापरले जाते. (Latest Marathi News)

हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. जे 6100rpm वर 20.2bhp पॉवर आणि 4,000rpm वर 27Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक ताशी 114 किमीचा टॉप स्पीड पकडते.

Royal Enfied Hunter 350 Gets Two New Colours
Samsung च्या तीन 5G स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर, 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Royal Enfield Hunter 350 चा व्हीलबेस 1370 mm आहे. जो Meteor आणि Classic 350 पेक्षा लहान आहे. याची इंधन टाकी क्षमता 13-लिटर आहे आणि सीटची उंची 800 मिमी आहे. बाईकला अनुक्रमे 110/70 फ्रंट आणि 140/70 मागील ट्यूबलेस टायर्ससह 17-इंच कास्ट अलॉय व्हील देण्यात आले आहे.

ब्रेकिंगसाठी बाईकमध्ये ड्युअल-चॅनल ABS सिस्टीम असून समोर 300mm डिस्क आणि मागील बाजूस 240mm डिस्क आहे. सस्पेन्शन ड्युटीसाठी बाईकच्या पुढील बाजूस 41mm टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस 6-स्टेप प्रीलोड अ‍ॅडजस्टेबल ट्विन इमल्शन शॉक स्पेंशन देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com