Royal Enfield Guerrilla 450 Saam Tv
बिझनेस

Royal Enfield नवीन दमदार बाईक 17 जुलैला होणार लॉन्च, 452cc चे मिळणार इंजिन; किती असेल किंमत?

Royal Enfield Guerrilla 450 बाईक 17 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ....

Satish Kengar

रॉयल एनफिल्ड बाईक्स आपल्या स्टायलिश लूक आणि दमदार इंजिनसाठी प्रसिद्ध आहेत. यातच आता कंपनी आपली नवीन बाईक Royal Enfield Guerrilla 450 लॉन्च करणार आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बाईक 17 जुलै 2024 ला लॉन्च केली जाईल.

कंपनी या बाईकमध्ये पॉवरफुल 452cc हाय पॉवर इंजिन देईल. बाईकमध्ये लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन असेल, जे लांबच्या मार्गावर जबरदस्त परफॉर्मन्स देईल. कार 40.02 पीएस पॉवर आणि 40 Nm टॉर्क जनरेट करेल. याच बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Royal Enfield Guerrilla 450 लॉन्च झाल्यानंतर याची स्पर्धा KTM 390 Adventure X आणि Bajaj Dominar 400 शी होणार. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Royal Enfield ची नवीन बाईक याच्या हिमालयन 450 पेक्षा लूक आणि स्टाइलमध्ये एक पाऊल पुढे असेल. सेफ्टीसाठी नवीन बाईकच्या दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

ही बाईक एलईडी हेडलाइट आणि डिझायनर टेललाइटसह उपलब्ध असेल. यात ब्लॅक अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर मिळतील. या बाइकमध्ये हाय स्पीडसाठी 6 स्पीड ट्रान्समिशन आहे. ही बाईक 170 kmph चा टॉप स्पीड देईल.

सध्या कंपनीने आपल्या नवीन बाईकच्या किंमतींचा खुलासा केलेला नाही. मात्र अशी शक्यता वळवण्यात येत आहे की, ही बाईक 2.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सर्कगे अॅडव्हान्स फीचर्स मिळू शकतात. ही बाईक नेव्हिगेशन, ड्युअल डिस्क ब्रेक आणि स्टायलिश राउंड लाइट्ससह येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा उद्याच मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

Sharad Pawar Speech : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, मातोश्रींना माहीतच नव्हतं; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

Vaibhav Suryavanshi: वय वर्ष फक्त १३! वैभव सूर्यवंशीवर या संघाने लावली कोटींची बोली

SCROLL FOR NEXT