Royal Enfield Classic 350 Facelift Royal Enfield Classic 350
बिझनेस

Royal Enfield: रुबाब वाढणार! Royal Enfield देणार 32 kmpl चं मायलेज, गजब मायलेजसह असेल शानदार स्पीड; जाणून कधी येणार बाईक

Royal Enfield Classic 350 Facelift : या बाइकमध्ये ट्यूबलेस टायर आणि गोल हेडलाइट्स असतील. बाईकमध्ये सिंगल आणि स्प्लिट सीट असे दोन्ही पर्याय असतील. या बाईकमध्ये दमदार 350cc इंजिन देण्यात येणार आहे.

Bharat Jadhav

रॉयल एनफिल्डच्या बाईकचा बाजारात एक वेगळाच दबदबा आहे. आता कंपनी आपली नवीन बाईक आणणार आहे. या बाईकचं मायलेज पाहून बाईक प्रेमी या दुचाकीच्या प्रेमात पडतील यात शंका नाही. या नवीन बाईक एलईडी हेडलाइट आणि पायलट लॅम्पसह उपलब्ध असेल. ही बाईक Royal Enfield Classic 350ची अपडेट वर्जन आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाइक्सपैकी एक बाईक असलेल्या बुलेटमध्ये आता नवीन वर्जन येत आहे. या बाईकला ड्रम आणि डिस्क ब्रेक हे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बाईक ऑगस्टमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.

रॉयल एनफिल्डशी स्पर्धा करणारी BSA गोल्ड ऑगस्टमध्ये आपली नवीन स्टार 650 लॉन्च करणार आहे. त्यापूर्वी रॉयल एनफील्डची ही नवीन बाईक लॉन्च केली जाणार आहे. Royal Enfield Classic 350 ची किंमत 1.93 लाख एक्स-शोरूम अशी असेल. या बाईकमध्ये हाय स्पीडसाठी 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असेल तर ही दमदार बाईक रस्त्यावर 97.92 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देण्यात आलाय.

बाजारात उपलब्ध असलेल्या क्लासिक 350 मध्ये 350cc इंजिन आहे. हेच इंजिन नवीन बाईकमध्ये देखील उपलब्ध असेल. उच्च मायलेजसाठी, बाईक 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क देईल. ही बाईक रस्त्यावर सहज 32 kmpl पर्यंत मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. या बाईकमध्ये 6 प्रकार आहेत. या बाईक आकर्षक रंगात असणार आहेत. बाईकच्या सीटची उंची 805 मिमी असेल ज्यामुळे खराब रस्त्यांवर बाईक चालवल्यास चालकाला आरामदायी वाटेल.

ही स्टायलिश बाइक वायर स्पोक व्हील आणि अलॉय व्हील या दोन्ही पर्याय उपलब्ध असणार आहे. ही बाईक डिस्क ब्रेकसह उपलब्ध असेल. या बाईकमध्ये 13 लीटरची मोठी इंधन टाकी देण्यात येणार आहे. बाईकचे एकूण वजन 195 किलोग्रॅम आहे. यामुळे ही बाईक अधिक वेगात चालकाला मजबूत पकड मिळत असते. या बाईकमध्ये एकत्रित ब्रेकिंग सिस्टम असणार आहे. ही बाईक 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. बाईकला ट्यूबलेस टायर आणि गोल हेडलाइट्स देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT