रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय
रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही
रेपो रेट ५.५० टक्क्यांवर स्थिर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे. या पतधोरण बैठकीत रेपो रेट न बदलण्याची घोषणा केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. या वर्षभरात जवळपास तीन वेळा रेपो रेटमध्ये कपात झाली आहे. हा रेपो रेट सध्या ५.५० टक्के आहे. तो यापुढेही असाच राहणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रेपो रेटवर बोलताना ते म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीने रेपो दर 5.5% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आर्थिक स्थिरता आणि महागाई नियंत्रणासाठी घेण्यात आला. बाजारातील तरलता आणि विकासाला चालना देण्यासाठी धोरण संतुलित ठेवण्यात आले आहे. जागतिक व्यापारातील तणाव आणि महागाई नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे होम आणि कार लोनच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचा परिणाम थेट तुमच्या बँकेच्या ईएमआयवर होणार आहे.आता तुमच्या होम लोन आणि कार लोनवरील व्याजात कोणताही बदल होणार नाहीये. तुम्हाला जेवढा ईएमआय याआधी भरावा लागत होता तेवढाच यापुढेही भरावा लागणार आहे. सध्याचा स्थितीचा विचार करुन रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढेही अर्थव्यवस्था अधिक चांगली होईल, असं संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट हा प्रत्येक तीन महिन्यांनी ठरवला जातो. रेपो रेटमुळे बँका आपल्या कर्जावरील व्याजदर ठरवतात.देशातील सर्वात मोठी बँक याबाबत निर्णय घेते.
सध्या रेपो रेट काय आहे?
सध्या रेपो रेट ५.५० टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
रेपो रेट वाढला की कमी झाला?
आज ६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ५.५० टक्क्यांवर स्थिर आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.