inflation News  Saam tv
बिझनेस

Retail Inflation: आनंदाची बातमी! महागाईने गाठला 6 वर्षातील नीचांकी स्तर, काय झालं स्वस्त?

Retail Inflation News : महागाईने 6 वर्षातील नीचांकी स्तर गाठलाय. यामुळे जून महिन्यात अनेक वस्तूंचे दर कमी झाल्याचे दिसून आलं.

Vishal Gangurde

महागाईच्या मुद्द्यावरून सर्वसामान्यांना दिलासा देणारं वृत्त हाती आलं आहे. सरकारने जून महिन्याचा महागाईचा दर जाहीर केला. मे महिन्याचा २.८२ टक्के या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या तुलनेत जूनमधील ग्राहक किंमत निर्देशांक घसरून २.१० टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे महागाईने ६ वर्षातील निचांकी स्तर गाठला. याचा थेट परिणाम किराणा दुकानातील वस्तूंवर पाहायला मिळाला. यामुळे दूध, मसाले, दाळी आणि भाज्यांसहित अन्य वस्तूंच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सोमवारी महागाई दराचे आकडे जाहीर केले. ग्राहक किंमत निर्देशांकात घसरण झाल्याने महागाई दरातही मोठा बदल पाहायला मिळाला. जून महिन्यात भाज्या, दाळी, मासे, साखर, मिठाई, दूध आणि दूधाने तयार करण्यात आलेले उत्पादनात घट पाहायला मिळाली.

६ वर्षांनी महागाईत घट

सरकारकडून महागाईचे दर जाहीर करण्यात आले. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यातील महागाई दरात ७१ बेसिस पाँइटने घट झाली. तर जानेवारी २०१९ सालानंतर सर्वात कमी महागाई दर नोंदवण्यात आला आहे. मात्र, हा दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या मध्यम कालावधीच्या लक्ष्याच्या खालीच कायम आहे.

सलग पाचव्या महिन्यात किरकोळ महागाई दर हा मर्यादेपेक्षा खाली राहिलाय. देशात सलग आठव्या महिन्यात किरकोळ महागाई दर आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या मर्यादेपेक्षा कमी आहे. देशातील ग्रामीण भागातील महागाई दर - 0.92 टक्के आणि शहरी भागात -1.22 टक्के इतका नोंदवण्यात आलाय.

आरबीआयने वर्षाच्या सुरुवातीला सलग तीन वेळा व्याज दरात कपात केली आहे. जून महिन्यात झालेल्या एमपीसी बैठकीनंतर ५० टक्क्यांनी कपात घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर हा दर ५.५ टक्के इतका करण्यात आला होता. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्याने महागाईतही घट झाली होती. पुढेही महागाईत घट होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस दंगली घडवेल - मनोज जरांगे पाटील

Prajakta Mali Birthday: वाढदिवसानिमित्त प्राजक्ता माळीने घेतले भीमा शंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, फोटो केले शेअर

Kalyan : कल्याणमध्ये मराठी-अमराठी वाद! परप्रांतीय हॉटेलचालकाचे मराठी माणसांबद्दल अपशब्द, मनसैनिकांनी काय केलं पाहा; VIDEO

घरातून पळून आली, ड्रायव्हरची वाईट नजर, २ दिवस बसमध्ये बलात्कार; परिसरात खळबळ

Crime News: नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; १० कोटींचं ‘मेफेड्रॉन’ जप्त

SCROLL FOR NEXT