Reliance Jio Cheapest Recharge ANI
बिझनेस

Jio Recharge: जिओ वापरकर्त्यांना आणखी एक झटका, कंपनीने बंद केले दोन स्वस्त प्लान, आता फक्त एकच रिचार्ज

Jio Recharge Plan: जिओ वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिओने आपले सर्वात स्वस्त असलेले दोन प्लान बंद केले आहेत. त्यामुळे युजर्सच्या खिशाला फटका बसणार आहे.

Siddhi Hande

जिओ कंपनीने अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ केली आहे. रिचार्जच्या किंमतीत वाढ केल्याने युजर्सच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. ३ जुलै २०२४ पासून रिलायन्स जिओ आपल्या मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ करणार आहे. याचसोबत जिओ कंपनी आपले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान बंद करणार आहे. कंपनी ३९५ रुपये आणि ५९९ रुपयांचे रिचार्ज प्लान बंद करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा उपलब्ध होता.

जिओचे हे दोन्ही प्लान अनलिमिटेड डेटासह उपलब्ध होते. ३९५ रुपयांचा प्लान ८४ दिवसांचा होता. तर १५९९ रुपयांच्या प्लानमझ्ये ३३६ दिवसांची वॅलिडिटी होती. जिओचे हे रिचार्ज प्लान सर्वाधिक लोकप्रिय होते. अनेक लोक हाच रिचार्ज करायचे. परंतु आता हा रिचार्ज प्लान बंद होणार आहे. जिओच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे. देशभरात सर्वाधिक लोक जिओ सिम कार्डचा वापर करतात. परंतु जिओच्या या निर्णयामुळे त्यांना चांगला फटका बसला आहे.

युजर्स अजूनही प्रीपेड प्लान रिचार्ज करु शकतात. परंतु ३९५ आणि १५५९ रुपयांचे रिचार्ज उपलब्ध नाही. आता जुन्या प्लानमधील फक्त १५५ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे.परंतु या रिचार्ज प्लामधील डेटा लिमिट कमी करण्यात आली आहे.याआधी १५५ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लामध्ये ६ जीबी डेटा मिळत होता. मात्र, आता हा फक्त 2GB डेटा मिळतो.

जिओनंतर आता एअरटेल कंपनीनेदेखील आपल्या रिचार्ज प्लानमध्ये वाढ केली आहे. रिचार्ज प्लान २० ते २७ टक्क्यांनी वाढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT